सोशल मीडियाच्या जगात कोणाला काय दिसेल हे कधीच कळत नाही. अनेकवेळा असे व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की हे खरोखर घडू शकते का? असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर, या व्हिडीओतील तरुणाचं धाडस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
बिबट्यासोबत सेल्फी
सेल्फी घेणाऱ्यांचे धाडस आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. कुणी उंच शिखरावर सेल्फी घेतली, तर कुणी खोल दऱ्यांसोबत. समुद्र किनारे किंवा पर्यटनस्थळी धोकादायक सेल्फी घेतल्याने अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. आम्ही आपल्याला जी घटना सांगत आहोत ती काहीशी वेगळी आहे. एका बहाद्दराने चक्क शेतात असलेलल्या बिबट्यासोबत सेल्फी घेतली असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
(हे ही वाचा : “…तर मला माझ्याच कंपनीतून काढलं असतं”, ‘ही’ SUV कार ठरली असती कारणीभूत; आनंद महिंद्रांनी सांगितला ‘तो’ किस्सा )
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण शेतात सेल्फी काढत आहे पण तो ज्याच्यासोबत सेल्फी घेत आहे हे धक्कादायक आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास तो आनंदाने बिबट्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये तरुणाच्या पायाजवळ एक बिबट्या असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओची पुष्टी करू शकत नाही.
येथे पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणाले?
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “हे पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही.” दुसऱ्याने लिहिले, “याला जिगरा म्हणतात.” एका यूजरने लिहिले की, “पहा थेट सेल्फी कशा प्रकारे लोकांचा जीव घेत आहेत.” एका यूजरने लिहिले की, “हे अशक्य आहे आणि यावर विश्वास कसा ठेवता येईल.” अनेक युजर्सनी व्हिडिओवर आश्चर्यकारक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “हे धोकादायक आहे.” तर दुसऱ्याने म्हटले की, हा व्हिडिओ कुठला आहे तो सेल्फी घेणारा व्यक्ती जिवंत आहे की नाही,” अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी केल्या आहेत.