सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; काही जण फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशा विविध प्रकारच्या डान्सचा आधार घेत असतात. तर काही जण फक्त स्वत:च्या मजा, आनंदासाठी तो क्षण एन्जॉय करत असतात.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी बनवलेल्या रील्स पाहायला मिळत आहेत. तसंच ‘फुलवंती’ प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटातील मदनमंजिरी हे गाण खूप गाजलं, त्यावरही लाखो लोकांनी डान्स करत रिल्स बनवल्या. सध्या याच गाण्यावर एक तरुण थिरकला आहे आणि त्याच्या या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
हेही वाचा… याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण मदनमंजिरी या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटातील हे गाण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या गाण्यावर अनेक कलाकारांनी, सोशल मी़डिया क्रिएटर्सने डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या असाच डान्स एका तरुण मुलाने केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.
अभिनेत्री प्राजक्ता माळीसारख्या हुबेहुब स्टेप्स करत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अदा, हावभाव आणि जबरदस्त डान्स केल्याने सगळेच कौतुकाचा वर्षाव त्याच्यावर करत आहेत.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/reel/DDeDCT5t_0X/?igsh=QkFSSXdDVW0xeA%3D%3D
तरुणाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @locha_e_ulfhat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मनातलं प्रेम जिथे शब्दात मावत नाही, तिथेच ‘मदनमंजिरी’ साजरी होते…” अशी कॅप्शन याला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एका स्त्रीलासुद्धा मागे टाकेल असा परफॉर्मन्स, खूप सुंदर” तर दुसऱ्याने “ती नजर, ती अदा, लय भारी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “सुंदर, एखादं वेळेस मुलींना देखील लाजवेल असा सुंदर नाच केला आहे”