सैनिक आपल्या रक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र कर्तव्य बजावतात. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ते चोख निभावतात. सर्वात आधी ते देशसेवेचा विचार करतात, त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. पण अनेकदा त्यांच्या कार्याला, त्यांना गृहीत धरले जाते. केवळ एखाद्या सैनिकाला वीरमरण आले किंवा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर तेव्हा थोडे दिवस त्यांच्या कार्याची चर्चा केली जाते. पण त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला असणे गरजेचे आहे. कृतज्ञतेची ही जाणीव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा असलेला दिसत आहे. तेव्हा तिथून जात असलेला सैनिक या तरुणाला दिसतात. यावर हा तरुण त्यांना वाकून पाया पडत, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. पाहा व्हायरल व्हिडीओ.
आणखी वाचा- Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ
आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील तरुणाच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात सैनिकांप्रती अशी कृतज्ञता असावी, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.