जिथे साप हे नुसते नाव ऐकूनदेखील काहींच्या अंगावर शहारे येतात, तिथे या तरुणाने चक्क एका सापाच्या डोक्याला किस केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आरामात त्या सापाच्या जवळ जाऊन, त्याच्या डोक्यावर किस करीत आहे. हा साप कोणताही साधारण साप नसून, सापांमध्ये सर्वांत विषारी ‘किंग कोब्रा’ आहे. तरीही व्हिडीओमधील व्यक्ती त्या कोब्राला चक्क किस करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या मनात जरी धडकी भरली असली तरीही तो तरुण हे सर्व अतिशय आत्मविश्वासाने आणि शांतपणे करीत होता. एवढेच नव्हे, तर त्या किंग कोब्राला किस केल्यानंतर काही सेकंद तो तसाच थांबून, कॅमेऱ्यासाठी पोजदेखील देत होता. हे सर्व पाहून नेटकऱ्यांनी या तरुणाच्या हिमतीची दाद दिलेली आहे. परंतु, असे धाडस जरा जास्तच धोकादायक आहे नाही का?

हेही वाचा : Video : झेंडूच्या फुलांपासून बनवले आईस्क्रीम; काय आहे रेसिपी आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर हा व्हिडीओ @snake_lover_narasimha या हँडलने शेअर केला असून, या व्हायरल व्हिडीओला २० लाखाहून अधिक व्ह्युज आणि एक लाख ६३ हजार लाइक्सदेखील मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी अर्थातच यावर अनेक प्रतिक्रिया दिलेल्या असून, काहींना या तरुणाचे कौतुक वाटले आहे; काहींना हे विनाकारण केलेले धाडस असून, त्याच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. एकाने तर “मला कोणी असं करण्यासाठी लाखभर रुपये जरी दिले तरीही मी असं काहीही करणार नाही,” असे म्हणून त्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

कौतुकासोबतच काहींना या तरुणाने हे एवढे धाडस कशासाठी केले आहे? याची गरजच काय? अशी विचारणा केली आहे. एकाने, “अरे पण का? हे कशासाठी केलं आहे?” असे विचारले आहे; तर दुसऱ्याने “बापरे! हिमतीची दाद द्यायला हवी; पण एकच प्रश्न आहे.. कशासाठी?,” असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जरी तो तरुण अतिशय आत्मविश्वासानं आणि धाडसाने त्या ‘किंग कोब्रा’जवळ जाऊन त्याच्या कपाळावर किस करीत असला तरीही आवश्यकता नसताना अशा धोकादायक प्राण्यांजवळ जाणं खरंच गरजेचं आहे का, अशा प्रश्नावर विचार करायला भाग पडतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man fearlessly plants a kiss on venomous reptile king cobra head watch the viral video and netizens reactions dha