अलिकडे तरूणाईने सोशल मीडियात धूम केली आहे. इमेज क्रीएटींगच्या नादात तरूणांची काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करण्याची सतत धडपड सुरू आहे. हा प्रकार जीवघेणा किवा धोकादायक का असेना. सोशल मीडियावर असाच एक प्रकार व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या बाइकवर उभा राहून धोकादायक स्टंट करताना दिसतो. ही स्टंटबाजी पाहताच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्टंटबाजीच्या व्हायरल व्हिडीओत नेमकं आहे तरी काय?

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”

सोशल मीडियावर नेहमीच काही तरुण मंडळी स्टंटचे व्हिडीओ शेअर करत असतात. खूप जास्त फॉलोअर्स मिळवणं किंवा व्हिव्यूज मिळवणं हे त्यामागचा त्यांचा हेतू असतो आणि त्यासाठी काही तरुण काहीही करण्याची तयारी दाखवतात. यामध्ये बऱ्याचदा ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत आणि याचा परिणाम कधी-कधी फारच गंभीर होतो. @the_corner__kid नावाच्या वापरकर्त्याने Instagram वर हा व्हिडीओ शेअर केला. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मोटारसायकलवरून जाताना आणि धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काही क्षणांनंतर, मुलाचा तोल सुटला आणि तो मोटारसायकलवरून खाली पडताना दिसत आहे.

(आणखी वाचा : अरेच्छा! एका लग्नाची अनोखी स्टोरी; नवरदेवाची चक्क शवपेटीतून एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल )

स्टंटबाजी धोकादायकच!

हा व्हिडीओ ८ नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याला २.२ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि २०७k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. काहींनी मुलाच्या कृतीवर टीका केली आहे, तर काहींनी मुलाच्या मूर्खपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “हा इतका मूर्ख आहे की तो कधीही विसरणार नाही.” एका वापरकर्त्याने लिहिले. “मला आशा आहे की तो ठीक आहे,” एका वापरकर्त्याने टिप्पणी दिली. “मी खूप निराश झालो आहे… मी त्याच्या शौर्याचे कौतुक करतो, पण पुढच्या वेळी कृपया जास्त सावध राहा” तिसरा म्हणाला. “देव तुम्हाला आशीर्वाद देईल,” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. मात्र, मंडळी तुम्ही हा व्हिडीओ पाहून तसं करण्याचं धाडस अजिबात करु नका. हा प्रकार आपल्या जिवावर कधी उठेल याचा काही नेम नाही. त्यामुळं वाहतूक नियमांच पालन करूनच वाहनं चालवा.

Story img Loader