सध्याच्या डिजिटल जमान्यात सर्व पेमेंट्स युपीआयद्वारे सहजरित्या केली जातात. मग ते साध्या चहाच्या टपरीवर असो मंडईतला भाजी विक्रेता असो किंवा एखादे मोठे हॉटेल असो सगळीकडेच युपीआयद्वारे पेमेंट (UPI Payment) करण्याची सोय उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपणाला आता पेमेंट करण्यासाठी कॅश जवळ ठेवावी लागतं नाही. तर दुकानदारांनाही आता त्याच्याजवळ सुट्टे पैसे ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे सर्वांनाच या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

पण तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे लोकांची कामं सोप्पी झाली असली तरी लोकांना यापेक्षाही काहीतरी सोप्पा पर्याय उपलब्ध व्हावा असं वाटतं. याच सोप्या पर्यायासाठी एका व्यक्तीने केलेली कृती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, तैवानमधील एका व्यक्तीने युपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करताना सतत मोबाईल वापरावा लागतो आणि मोबाईल सतत बाहेर काढायचा कंटाळा येतो म्हणून त्याने चक्क हातावरच बारकोड टॅटू काढला आहे. शिवाय त्याने हातावर काढलेल्या टॅटूद्वारे पेमेंटदेखील यशस्वीरित्या होत आहेत. त्यामुळे “माणसांनी आळशीपणाचा कळस गाठला आहे हेच या घटनेवरुन समोर आलं” असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही पाहा- Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

दरम्यान, याआधी अनेक लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाचा टॅटू काढायचे, पण या बहाद्दराने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत हातावर बारकोडचा टॅटू बनवल्यामुळे तो चांगलाचं चर्चेत आला आहे. सध्या या व्यक्तीने आपल्या हातावर काढलेल्या बारकोडची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, ज्या व्यक्तीने हा टॅटू आपल्या हातावर काढला आहे त्याने आपली ओळख जाहीर केलेली नाही. मात्र, “डीकार्ड” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा टॅटू व्हायरल झाल्यानंतर तो आता तैवानमध्ये लोकप्रिय झाला आहे.

बारकोड बनवणं अवघड काम –

या व्यक्तीने हातावर टॅटू काढला असला तरी, बारकोड बनवणं वाटतं इतके सोप्पं नाहीये, कारण कोणताही बारकोड तयार करत असताना त्यामध्ये पेमेंटसाठी आवश्यक असणारी माहिती असते. शिवाय बारकोडमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक डिझायनला काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे बारकोड बनवताना त्याच्यातील एखाद्या ओळींमध्ये थोडासा जरी बदल झाला, तर त्या बारकोडचा काही उपयोग होत नाही. तरीही या व्यक्तीच्या हातावरील बारकोड यशस्वीरित्या काढण्यात आल्यामुळे टॅटू काढणाऱ्याचं कोतुक केलं जात आहे.

टॅटू काढण्याचा विचार करु नका’-

हेही वाचा- बापरे! सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारी डॉक्टर निघाली १० वी पास

महत्वाची बाब म्हणजे टॅटू काढणाऱ्या व्यक्तीनेच, आपली कल्पना एवढीही चांगली नसल्याचं कबुल केलं आहे. कारण, हातावर काढलेला टॅटू काही दिवसांनी नष्ट होऊ शकतो. कारण, माणसाच्या त्वचेमध्ये दिवसेंदिवस बदल घडत असतात. त्यामुळे काही दिवसांनी हातावर काढलेला बारकोड स्कॅन करणं बदं होईल. त्यामुळे तुच्यापैकी कोणी असा टॅटू काढण्याचा विचार करु नका आणि पेमेंटसाठी मोबाईल वापरण्यात कंटाळा करु नका. असं आवाहन त्याने इतरांना केलं आहे. पण त्याच्या या अनोख्या कल्पनेमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेता विषय ठरला आहे. कोणी त्याचं कौतुक करत आहे तर कोणी त्याला आळशीपणाचा कळस असल्याचं म्हणत आहेत.