डिसेंबर महिना सुरू झाला की, थंडीचा कडाका जाणवू लागतो. थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी अनेक जण जॅकेट्स, स्वेटर घालतात. काही जण रात्रीची मस्त शेकोटी घेतात. तर, अनेकांच्या घरी हीटरही असतो. या सगळ्या गोष्टी तर सामान्य झाल्या; पण एका माणसानं थंडीपासून वाचण्यासाठी एक असा जुगाड केलाय, ज्याचा तुम्ही स्वप्नातदेखील विचार करू शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरात एकापेक्षा एक जुगाडू लोकं आहेत. हे लोक असे असे जुगाड करून दाखवतात ज्याचा आपण कधीच विचार केला नसेल. असाच एक अतरंगी जुगाड समोर आला आहे. हा जुगाड पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल. 

हेही वाचा… अशी सायकल तुम्ही कधीच चालवली नसेल! दोघं एकत्र पेडलवर उभे राहिले अन्…, चिमुकल्यांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

थंडीपासून वाचण्यासाठी जीवघेणा जुगाड

थंडीच्या महिन्यात तरुणानं केलेला हा जुगाड पाहून सगळ्यांना जोरदार धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चर्चा सर्वत्र आहे. खूप थंडी वाजतेय म्हणून ऊब मिळण्यासाठी या तरुणानं एका भांड्यात नारळाच्या किशी जमा करून, आग पेटवली आहे. पण, त्या आगीनं शेकोटी न घेता, तरुणानं ते आगीचं भांडं सरळ बेडच्या आतमध्ये ठेवलेलं या व्हिडीओमध्ये दिसतंय. आगीचा टोप बेडमध्ये ठेवल्यावर तरुण बेड बंद करतो आणि अंगावर पांघरूण घेऊन झोपून जातो.

तरुणाचा थंडीसाठी उपाय म्हणून केलेला जुगाड दाखविणारा हा व्हिडीओ @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. थंडी खूपच आहे, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… असा मित्र नसलेलाच बरा! भररस्त्यात मित्राचा पाठलाग केला, वेगात गाडी आली अन्…, पुढच्या क्षणी जे झालं ते धक्कादायक, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “भावा, जळत्या लाकडांवर झोप. ती जास्त वेळ जळतात.” तर दुसऱ्यानं “Dont try this at home” (हे घरी करून पाहू नका) अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “थंडीच्या नादात आग लागेल.”

दरम्यान, सोशल मीडियावर थंडीच्या जुगाडांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल झालेला माणसाच्या जुगाडाचा हा व्हिडीओ जास्तच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man jugaad to protect against cold put fire vessel under bed viral video on social media dvr