सापाचं नावं घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेकजण सापाला खूप घाबरतात. साप चावला तर कधीकधी मृत्यूही होण्याची शक्यता असते. असं असूनही काहीजण सापासोबत विचित्र प्रकार करताना दिसतात. यासंबधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या समोर आलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे प्राण वाचवले आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शेततळं आहे ज्यामध्ये एक साप आहे. दरम्यान एक व्यक्ती दोरीच्या सहाय्याने उतरुन सापाचे प्राण वाचवत आहे. एकीकडे आपण सापाजवळ जाण्याचीही हिंमत करत नाही. दुसरीकडे हा व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: १०० वर्षांचे वडील अन् ७५ वर्षाचा मुलगा..रुग्णालयातील ‘तो’ भावनिक क्षण पाहून भारावून जाल)
mr_vsg._ या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून या व्हिडीओवर अनेकजण खूप साऱ्या मजेशीर आणि भीतीच्या कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.