सोशल मीडियावर लोकांनी पैसे उधळल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी गाण्याच्या कार्यक्रमात तर कधी लग्नाच्या वरातीत अनेकजण अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत असतात. सध्या अशीच एका घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने रस्त्यावरुन जात असताना कारच्या खिडकीतून पैसे फेकले आहेत. शिवाय या व्यक्तीने आपल्या कारमधून एक दोन लाख नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये फेकल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांना पैसे फेकण्याचं जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसदेखील थक्क झालेत.

१ कोटी ६३ लाख रुपये उधळले –

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला

हेही पाहा – लेडीज सीटवर पुरुष बसल्याने दोन बायकांमध्ये राडा; Video पाहून लोक म्हणाले, “फ्री तिकीटचा परिणाम”

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमेरिकेतील ओरेगन शहरातील असून कॉलिन डेव्हिस मैक्कार्थी असे पैसे फेकणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. कॉलिनने धावत्या कारमधून सुमारे दोन लाख डॉलर्स म्हणजेच, जवळपास १ कोटी ६३ लाख रुपये फेकल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व पैसे त्याने हायवेवर फेकले आहेत. त्याने या नोटा रस्त्यावर फेकायला सुरुवात करताच त्याच्या आसपास असणाऱ्या लोकांनी त्या नोटा गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिवाय अनेकांनी आपल्या गाड्या थांबवून नोटा उचलायला सुरुवात केली. शिवाय ज्यांना या घटनेची माहिती मिळाली ते सगळे पैसे गोळा करण्यासाठी आले.

हेही पाहा- Video: अतिक अहमदची हत्या करणाऱ्या आरोपीचे शेवटचे Reel व्हायरल, रीलमधील गाणे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

दरम्यान, कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांचे पथक ताबडतोब त्या व्यक्तीच्या कारजवळ पोहचले आणि त्यांनी कॉलिनला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. यावेळी त्याने हे पैसे का फेकले? असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यानंतर, तो म्हणाला की, माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मला इतरांना काहीतरी गिफ्ट करायचे आहे. म्हणूनच रहदारीच्या रस्त्यावर नोटा उधळल्या, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीनुसार त्या घेता येतील. त्याचे हे उत्तर ऐकल्यानंतर पोलिसांनी त्याला काही वेळाने सोडून दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

Story img Loader