गेल्या कित्येक वर्षांमध्ये माणसाने स्वतःची खूप प्रगती केली आहे. त्याने अनेक शोध लावले आहे. या शोधांमुळे माणसाचे जीवन अतिशय सोपे झाले आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, “गरज हीच शोधाची जननी.” म्हणजेच आपली गरज भागवण्यासाठीच माणसाने वेगवेगळे शोध लावले. मग ते कपडे धुण्याचं मशीन असो, किंवा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या असो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण हे सर्व मोठे शोध झाले, आपल्या दैनंदिन जीवनातही लोक लहान-मोठ्या युक्त्या वापरून आपली कामं लवकर करण्याचा प्रयत्न करतात. यालाच आपण ‘देशी जुगाड’ म्हणतो. भारतातील लोक सर्व काही सोपे करण्यासाठी जुगाड वापरण्यात पटाईत आहेत. येथील लोक त्यांच्या जुगाडाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.

तीन जोडीदारांपासून ९ मुलं असणारे इलॉन मस्क म्हणतात, “प्रत्येकाचे कुटुंब…”

आनंद महिंद्रा अनेकदा अशा पोस्ट किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळीही त्याने असाच एक अप्रतिम व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “एक जुनी म्हण आहे – गरज ही शोधाची जननी असते…”

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये, एक तरुण गुडघाभर पाणी साचलेला भाग पार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या स्टूलसह एक अनोखा ‘जुगाड’ करतो. पाण्यात उतरावे लागू नये म्हणून या तरुणाने स्टूलला दोरी बांधली असून, त्याच्या मदतीने तो एक स्टूल उचलून पुढे करतो, नंतर दुसरा स्टूल पुढे करतो. अशा प्रकारे तो स्टूल घेऊन चालतो आणि पाण्याने भरलेला रस्ता पार करतो.

अबब! या माणसाने फक्त दातांच्या मदतीने खेचल्या तब्बल पाच गाड्या; पाहा Viral Video

आनंद महिंद्रा यांचा हा व्हिडीओ रिट्विट करून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘तुम्ही इतक्या पोस्ट कुठून आणता..? तुमच्या घरी शेती आहे का?’ त्याचवेळी दुसरा युजर म्हणाला, भारत जुगाडची भूमी आहे. सर, इथल्या जुगाडासमोर जग नतमस्तक होते.

रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसच्या व्हिडीओने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; Viral Video पाहून नेटकरी म्हणतात ‘हेच खरे रहस्य!’

आणखी एका वापरकर्त्याने लिहले, “उत्तम कल्पना! पण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे दोन स्टूल नेणे अशक्य आहे, त्यासाठी काहीतरी नवीन विचार करण्याची गरज आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man used a desi jugad to cross the road through knee deep water video posted by anand mahindra got viral pvp
Show comments