Shocking Video Viral : मजा-मस्ती करायला कोणाला आवडत नाही. अनेक जण व्यग्र शेड्युलमध्येही मजा मस्ती करण्यासाठी वेळ काढतात. कधी कामावर मित्रांसह, तर कधी एकटेच मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत. अशाच प्रकारे एक ब्लँकेट विक्रेता त्याच्या मित्रांसह रस्त्याच्या कडेला बसून ब्लँकेट्सवर कोलांट उड्या मारत होता; पण त्याची क्षणभराची मजा त्याला चांगलीच महागात पडली. नेमकं या तरुणाबरोबर काय घडलं ते व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा.

अनेकदा आपण मजा-मस्ती म्हणून काही करायला जातो; पण ही मजा-मस्ती काही वेळा आपल्याच अंगाशी येते. अशा वेळी एक तर सर्वांसमोर आपलं हसं तर होतंच; पण काही वेळा आपल्या जीवालाही धोका निर्माण होतो. व्हायरल व्हिडीओतील तरुणाच्या बाबतीतही तेच घडले, रस्त्यावर ब्लँकेट विकणारा तो तरुण मजा-मस्ती म्हणून चटईवर अंथरलेल्या ब्लँकेट्सवर कोलांट उड्या मारत होता; मात्र असे करताना त्याची मान जोरात मुरगाळली गेली आणि तो बेशुद्ध पडला. हा व्हिडीओ इंदोरमधील असल्याचे सांगितले जात आहे.

तरुणाची मान मुरगळली अन्…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ब्लँकेट्स, चटई, रजई विकणाऱ्या विक्रेत्यांचा एक समूह रस्त्याच्या कडेला बसला आहे. यावेळी त्यांच्यातीलच एक तरुण एका चटईवर ठेवलेल्या ब्लँकेट्सवर मस्ती करीत कोलांट उड्या मारत होता. यावेळी इतर विक्रेते त्याच्याकडे एका बाजूला बसून पाहत होते. तरुणाने पहिल्यांदा एक कोलांट उडी मारली. त्यानंतर सर्व ब्लँकेट्स त्याने व्यवस्थित केले आणि तो दुसऱ्यांदा उडी मारण्यासाठी गेला; पण उडी घेताना त्याची मान जोरात मुरगाळली गेली आणि तो ब्लँकेटवर कोसळला. अनेकांना वाटलं की, तो ब्लँकेटवर असाच पडून राहिला आहे; पण काही मिनिटे झाल्यावरही तो जागेवरून न उठल्याने सर्व जण त्याला पाहण्यासाठी धावत आले. त्यावेळी तो तरुण कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतर सर्व विक्रेत्यांकडून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला जात होता; पण तो उठत नव्हता. यावेळी समजले की, त्याला कोलांट उडी मारताना त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच अपंग मुलीने पायाने लावा टिळा? ‘तो’ भावनिक Video नेमका कधीचा? वाचा

लगेचच त्याच्या मित्रांनी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे; पण या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांनी अशी चूक करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. हा व्हिडीओ @love_banjara_mp44 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स केल्या आहेत. काहींनी म्हटले की, प्रशिक्षकाशिवाय असे प्रकार करू नका. तर, काहींना हा व्हिडीओ पाहून धक्काच बसला आहे.

Story img Loader