Men harassing a girl viral video: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशीच एक घटना एका बसमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणीची दोन तरुण छेड काढत होते. पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

हेही वाचा… अशी मुलगी कधीच चुकीच्या मार्गाला लागत नाही! डिलीव्हरी गर्लचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तरुणांचा निर्लज्जपणा पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका तरुणीची छेड काढताना दिसतायत. बसमध्ये गर्दी असल्याने तरुणी उभी राहिली आहे. तिच्या मागे दोन तरुण उभे राहिले आहेत. सुरुवातीला त्यातला एक तरुण तिच्या कमरेवरून हात फिरवतो. ती मागे वळून पाहते तर तो दुसरीकडे पाहायला लागतो. नंतर त्याच्या बाजूलाच असलेला दुसरा तरुण तिच्या खांद्यावरून हात फिरवतो. हे सुरू असताना तरुणी खूप घाबरली असते. बसमधील काही प्रवासी या दोन तरुणांचा हा लज्जास्पद प्रकार बघतात आणि बसमध्येच त्यांना मागच्या सीटवर घेऊन जातात.

एक माणूस दोघांना मागच्या सीटवर बसवतो आणि त्या तरुणीला सांगतो की या दोघांना मार. त्यानंतर दोघांना बसमधून उतरवून मुलीला वाचवणारा सज्जन माणूस तिला विचारतो की, तू यांना घाबरतेस कशाला? यावर तरुणी रडत रडत म्हणते, माझा कोणी भाऊ नाही आहे, मी एकटी कशी यांच्याशी लढू शकेन.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @univerasl_vines01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… खिडकीबाहेर हात काढत असाल तर सावधान! बसमध्ये बसलेल्या प्रवाशाबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यांना चप्पलने मारायला पाहिजे.” तर दुसऱ्याने यांच्यासारख्या मुलांमुळे बाकीच्या मुलांचंपण नाव खराब होतं, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “तुम्हा मुलींना भावाची गरज का आहे? तुम्ही स्वत:चं संरक्षण करायला शिकायला पाहिजे.” “अशांना तर भरचौकात मारलं पाहिजे, मुलींची इज्जत करायला शिका”, अशी कमेंट एकाने केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young men harassed a girl in a bus girls abusing video viral on social media dvr