कधीही एकट्याने ट्रेकिंग करु नका. ट्रेकिंग ही अत्यंत काळजी घेऊन करण्याची गोष्ट असते आणि तिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, त्यामुळे काही अनर्थ ओढवल्यास आपल्यासोबत एखादी व्यक्ती असल्यास तिची मदत होऊ शकते.इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येतील तो शनिवार रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेक धंदेवाईक मंडळी ही संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात आणि इथून पुढे खरा धोका सुरू होतो.अनेकांनी या विकेंडला ट्रेंकींगला जाण्याचे प्लॅ केले असतील,मात्र त्या आधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पावसाळ्यात गड किल्ल्यांवर जाणे टाळा असा सल्ला देण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ट्रेकींगचा प्लॅन करताना विचार कराल. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका किल्ल्यावर काही ट्रेकर्स खाली उतरत असताना अचानक एक भला मोठा दगड खाली पडतो. दरम्यान या दगडाखाली यातील एका तरुणाचा पाय अडकतो तर काही जण जखमी होतात. हा तरुण वदनेनं विव्हळत आहे, इतर त्याला मदत करत आहेत. मात्र, दगडाचं वजन जास्त असल्यामुळे तो दगड बाजुला करताना अडचण येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: “हात लावू नको तुला नाही परवडणार”! दुकानदारानं केला अपमान, तरुणानं अख्ख दुकानच केलं खरेदी
गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलीस देखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे. जुन ते ऑगस्ट कालावधीत तुम्ही ट्रेक करू इच्छित असाल,पावसाळ्यामध्ये सह्याद्रीत भटकंतीला जावू इच्छित असाल तर विकेंडला कधीही प्लॅनिंग करु नका.