Girl cried after watching Chhatrapati Sambhaji Maharaj Movie: अनेक वर्षांपासून आपल्या देशासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या शूर वीरांच्या जीवनावर चित्रपट काढले जात आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळते आणि त्यातूनच आपली भूमी, धर्म तसेच आपल्या अस्तित्वासाठी या थोरांनी किती लढे दिले, स्वत:चा जीव धोक्यात टाकून ते किती संकटांना सामोरे गेले हेदेखील कळतं. चित्रपटातून गोष्ट लगेच कळते आणि म्हणूनच ती भावनिकरीत्या प्रेक्षकांशी जोडली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय सिनेसृष्टीत याआधीही अनेक बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत; जे पाहून अनेकांना अक्षरश: अंगावर काटा आला आहे. आता पुन्हा एकदा एक अशीच घटना एका चित्रपटागृहात घडली; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नुकताच चित्रपट पाहून झालेली एक तरुणी ढसाढसा रडू लागली. नेमका कोणता चित्रपट होता तो आणि तरुणी रडताना काय म्हणाली, ते जाणून घेऊ या..

हेही वाचा… रस्त्यात डिलिव्हरी बॉयची बंद पडली गाडी, पुढे अचानक पोलिसांनी अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

… अन् तरुणीने फोडला टाहो

नुकताच ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट प्रदर्शित झाला. अनेकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहिला. या चित्रपटादरम्यान अशी एक घटना घडली; जी पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट संपताच एका तरुणीला अश्रू अनावर झाले आणि चित्रपटगृहातच ती ढसाढसा रडू लागली. स्क्रीनकडे बघत “आम्हाला माफ करा महाराज”, असं म्हणत ती तिथेच ढसाढसा रडत होती. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की तिच्याबरोबर असलेली तिची मैत्रीण तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते; पण तरीही मनात करुण भावना दाटून आल्यामुळे त्या तरुणीचे डोळे पाणावलेले असतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून या ताईला अश्रू अनावर झाले” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

हेही वाचा… “जबाबदारी माणसाला वयाच्या आधीच मोठं करते”, भरउन्हात कष्ट करणाऱ्या लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ताईचे अश्रू बघून माझ्या डोळ्यांत पाणी आलं.” दुसऱ्याने “घरचे संस्कार”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “सिनेमा बनवल्याच सार्थक झालं. एका तरी ताईला माझा शंभुराजा कळला.” तसेच, “खंत वाटते की, खूप उशिरा इतिहास कळतोय आजकालच्या पिढीला. पण चला कळतोय आणि त्याची जाणीव होत आहे हे त्याहून महत्त्वाचे. धन्यवाद! त्या दिग्दर्शकांचे जे अशा प्रकारचे चित्रपट तयार करत आहेत,” अशीदेखील कमेंट एकाने केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman cried after watching chhatrapati sambhaji maharaj movie in theater viral video dharmarakshak mahaveer chhatrapati sambhaji maharaj movie dvr