सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी असे लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करत असतात. या प्रसिद्धीच्या वेडेपणापायी काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी तरुण, तरुणी भररस्त्यात अश्लील प्रकार करू लागतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी सार्वजनिक ठिकाणी चक्क ब्रा घालून डान्स करताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१७ मध्ये ‘मिस कोलकाता’ किताब जिंकल्याचा दावा करणारी मॉडेल सन्नाती मित्रा हिने कुर्तीवर ब्रा घालून डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहताच इंटरनेट वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी दिल्ली पोलिसांना टॅग करीत कारवाईची मागणी केली आहे.

प्रसिद्धीसाठी ओलांडली मर्यादा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ही तरुणी भररस्त्यात ड्रेसवर ब्रा घालून डान्स करताना दिसतेय. बॉलीवूड गाण्यावर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sannati__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल दोन मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं का करतात या मुली” तर दुसऱ्याने “असामान्य” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “पोलिस कृपया हिच्यावर कारवाई करा.”

दरम्यान, याआधीही @sannati__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मॉडेल सन्नाती मित्रा हिने अनेक अश्लील व्हिडीओ शेअर केले आहेत, जिथे ती काही ठिकाणी फक्त टॉवेल घालून फिरताना आणि डान्स करताना दिसतेय.