Young Woman saved her life: अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या अत्याचारांमुळे आजही मुली कुठेच सुरक्षित नाहीत, असे वाटू लागलेय. रात्री एकट्या असणाऱ्या मुलीची छेड काढणे, तिच्याबरोबर वाईट वर्तणूक करणे, तिचा पाठलाग करणे अशा आणि यापेक्षा अनेक वाईट घटना आपण ऐकल्या असतील. पण, आता तर दिवसाढवळ्या अशा विकृत विचारांची माणसे मुलींशी अश्लील चाळे करतात. त्यांना आता कसलेच भय उरले नाहीय. सध्या एका तरुणीबरोबर अशीच एक घटना घडली आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपल्या वाटेने जात असते. दोन संशयास्पद तरुण स्कूटरवर बसून तिच्या बाजूने जातात आणि तिच्याकडे बघत असतात. तरुणीला हे कळताच ती आपला मोबाईल लपवते आणि ते दोन्ही तरुण तिथून गेल्यानंतर ती अक्षरश: कचऱ्याच्या पिशवीत लपते.
u
रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी कचरा जमा केलेला असतो. तिथे दोन-तीन कचऱ्याच्या पिशव्या असतात. त्यातील एक कचऱ्याची पिशवी ती कचऱ्याच्या डब्यात रिकामी करते आणि त्या पिशवीत ती स्वत:ला झाकून घेत, त्यात लपून बसते. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे स्कूटरवर बसलेली माणसे येतात. ती माणसे तिला शोधू लागतात. ती तिथे नसल्याची खात्री केल्यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात. ते निघून गेले हे कळताच ती तरुणी पिशवीतून बाहेर येऊन आपला जीव वाचवते.
हा व्हायरल व्हिडीओ @irshad.zyan.97 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “बाहेर जाताना काळजी घ्या”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ शेअर होताच त्याला ६.९ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “ते एखाद्या वस्तूसारखं तिला शोधतायत.” तर दुसऱ्याने, “एकदम बरोबर केलंस तू ताई,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असे व्हिडीओ शेअर करू नका; नाही तर त्या विकृत लोकांना कळेल की, मुली स्वत:चा बचाव कसा करतात.” तिसऱ्याने, “जर हे खरं असेल, तर त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे.”