फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या नादात नागपूरमधल्या आठ तरूणांनी आपला जीव गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्येही अशीच घटना घडली होती. ब्युटीक्वीन आणि मॉडेल म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सोफिया मजेरकोचा हिचा लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान मृत्यू झाला होता. तिच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. अशी कितीतरी उदाहरणं ताजी असतानाच चेकमध्ये घडलेल्या अशाच दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. चेकमधल्या दोन तरूणी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वेगात गाडी चालवत होत्या. पण त्याचबरोबर या दोघींमधली एक जण फेसबुक लाईव्ही करत होती.
वाचा : मुंबईतील ‘या’ कंपनीमध्ये मासिक पाळीची मिळते विशेष रजा
निकोल आणि तिची मैत्रिण दोघीही गाडीत बसून बाहेर चालल्या होत्या. तेव्हा तिच्या मैत्रिणीने गंमत म्हणून आपल्या प्रवासाचं लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. यावेळी निकोल ताशी १०० किलोमीटरहून अधिक वेगाने गाडी चालवत होती. तिच्या शेजारी बसलेली मैत्रिण हा थरारक प्रवास आपल्या मित्रमैत्रिणांना सांगत होती, या नादात निकोलचं लक्ष विचलित झालं आणि गाडी समोर असणाऱ्या बॅरिअरवर आदळली. यात निकोलचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या शेजारी असणारी तिची मैत्रिण गंभीररित्या जखमी झाली. तिच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती नाजूक आहे. या दोघींची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Viral : लागली पैज; हे कोडे तुम्ही सोडवूच शकत नाही!
दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्येही फेसबुक लाईव्ह करण्याच्या नादात आठ जणांचा जीव गेला होता. नागपूरचे आठ तरुण वेणा जलाशय परिसरात सहलीसाठी गेले होते. या जलाशयात तिघेही मासेमारी करत होते. त्यांना पाहून या सर्वांना नौकाविहार करण्याची इच्छा झाली. त्यांनी मासेमारी करणाऱ्यांच्या होडीत बसून त्यांना जलाशयात फेरफटका मारण्याची विनंती केली. त्यानुसार नावेत तीन मासेमार आणि आठ तरुण असे एकूण अकरा जण बसले. नाव जलाशयाच्या मध्यभागी खोल पाण्यात गेल्यावर तरुणांना फेसबुक लाईव्ह करण्याचा आणि सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला. पण या गडबडीत छोटीशी होडी अनियंत्रित होऊन उलटली आणि नावेत असणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला.