Young woman removing saree viral video: सोशल मीडियावर आजकाल लाखोंच्या प्रमाणात रील व्हिडीओ व्हायरल होतात. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना या रील्सचं वेड लागलं आहे. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक काहीही करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी अगदी भररस्त्यात अश्लीलपणा करतात. कधी रस्त्यावर, कधी मेट्रोत, तर कधी गार्डनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणी जगाचं भान न राखता हे रीलस्टार व्हिडीओ शूट करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने भररस्त्यात चक्क आपली साडी काढायला सुरुवात केली. नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊ…

हेही वाचा… मुंबई लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर केलं ‘असं’ काही की…, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO व्हायरल

महिलेचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर एक महिला आपली साडी सोडताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध स्कूटर लावून आणि स्कूटरशेजारी उभी राहून ही महिला तिने नेसलेली साडी सोडत आहे आणि तिचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड करतंय. पण, साडी सोडल्यानंतर या व्हिडीओमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. साडी सोडल्यानंतर असं पाहायला मिळतं की, महिलेने साडीच्या आत जिन्स आणि टॉप परिधान केलं आहे. याच गोष्टीमुळे महिलेचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय झाला आहे.

https://www.instagram.com/reel/C-luMQoyqkm/?igsh=Y3JrMmJuNzZ4Z296

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @subha03rider_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “नवीन ट्रिक अनलॉक” असं कॅप्शन देण्यात आलं आहे, तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान हा महिलेचा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… “अशा मुलांना तिथेच फोडलं पाहिजे”, बसमध्ये भरगर्दीत तरुणांनी तरुणीबरोबर केलं लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून येईल संताप

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “ही ट्रिक भारताबाहेर नाही गेली पाहिजे.” तर दुसऱ्याने “वाह दीदी वाह” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “सासरवरून माहेरी जाताना”, तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “रस्त्यावर हे सगळं करायची काय गरज”, अशी कमेंट संतप्त होऊन एका नेटकऱ्याने केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman removing saree on road video viral on social media dvr