सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील जालौनमधील कालपी पोलिस ठाणे परिसरात घटना घडली आहे. जिथे स्कूटरवरून येणाऱ्या एका तरुण मुलीने दुचाकीवरून येणाऱ्या एका तरुणाला भेटून तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा आणि त्यामुळे तिच्या प्रियकराशी असलेले तिचे नाते तुटल्याचा आरोप त्याच्यावर केला. ही घटना एका वर्दळीच्या रस्त्याच्या मध्यभागी झाली. या वादामुळे तिथे खूप गर्दी जमली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
घटनेची माहिती
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, मुलीने त्या तरुणाला रस्त्यात थांबवलं आणि त्याला अनेक वेळा कानाखाली मारलं. तिने त्या तरुणावर बनावट व्हिडीओ रेकॉर्ड करून ते शेअर केल्याचा आरोप केला, ज्यामुळे तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य खराब झाले.
या व्हिडीओत ती त्या तरुणाला कानाखाली मारल्यानंतर म्हणते, तूच माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. यानंतर ती त्याचा फोन खेचून घेते आणि त्याला फोन करायला सांगते. “जोपर्यंत तू फोन नाही लावत तोपर्यंत तुला फोन मिळणार नाही. मीच करते फोन थांब, तू फोन सोड,” असं ती म्हणते. तो तरुण बाईकवरून उतरतो आणि तिच्या हातातून फोन खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. तिथे असलेल्या लोकांना ती विणवणी करत सांगते की कृपया या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करा.
ती पुढे म्हणते की, “प्रभाकर चतुर्वेदी माझे व्हिडीओ आणि रेकॉर्डिंग व्हायरल करतो. मी माझ्या कुटुंबापासून दूर राहते. याने असं सगळं करून माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं.” यावर लोक “हा कोण आहे?” असं विचारतात, तर याला उत्तर देत ती म्हणते, “हा माझा कोणी नाही. माझ्या बॉयफ्रेंडला चुकीचं सांगून याने माझं नातं खराब करून टाकलं. याने माझ्या घरी माझ्याबद्दल खूप काही चुकीचं सांगितलं.”
आत्महत्या करण्याची धमकी
तो तरुण तिच्याकडून त्याचा फोन खेचून घेतो. तसंच ती मुलगी यमुना नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची धमकीही त्याला देते. व्हिडीओमध्ये ती म्हणते, तू माझा अपमान केलास, माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस. तुझ्यामुळे मी यमुना नदीत आत्महत्या करेन”, असं म्हणत ती त्याच्याकडे मोबाइल मागण्याचा हट्ट करते.
तरुणीची ओळख
लोकांनी तिच्याबद्दल विचारलं असता ती म्हणते, “मी कानपूर ???देहातची??? आहे. एक दिवस याने माझा मोबाइल घेतला आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे असं सांगून माझ्या मोबाइलमधलं सगळं काही घतेलं. माझं याच्यावर प्रेम नाही, याने माझ्या कुटुंबाला आणि माझ्या प्रियकराला खोटं सांगितलंय.”
तरुणाची प्रतिक्रिया
रस्त्याच्या मधोमध तरुणीच्या अशा वागण्यावर तो तरुण संतापला आणि म्हणाला, तूच मला इथे तुझं काहीतरी काम आहे असं सांगून बोलवून घेतलंस.. आणि आता भररस्त्यात माझा असा अपमान करतेय. आता मी पुन्हा तुझ्या घरी जाईन. यावर तरुणीने दावा केला की तो खोटे बोलत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने तिचे नाव विचारल्यानंतरही तिने तिची ओळख उघड केली नाही. तथापि, तरुणीने त्या तरुणाची बॅग धरली आणि फोन करण्याचा आग्रह धरत राहिली.
यानंतर रागारागात तो तरुण एका महिलेला फोन करतो आणि तिला सांगतो की, ही माझी बॅग सोडत नाहीय, हिने माझा भररस्त्यात अपमान केलाय. हिला समजवा नाहीतर मीच हिला यमुना नदीत फेकून देईन.
पोलिस कारवाई
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही. तथापि, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.