Viral Video: सध्या फाइव्ह जी, फोर जीचा (5G, 4G) काळ सुरू असून, जास्तीत जास्त लोक अॅण्ड्रॉईड मोबाईल वापरतात. अॅण्ड्रॉईड मोबाईलपूर्वी कॅमेरा असलेला बटणांचा फोन वापरला जायचा. पण, आता अॅण्ड्रॉईड मोबाइलमुळे अनेक नवनवीन गोष्टी, सोशल मीडियाबद्दलची माहिती लोकांना मिळू लागली. याच मोबाईलमुळे आता लोक सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात; ज्यावर रील्स, गाणी, रेसिपी, प्रवास यांसारख्या अनेक विषयांसंबंधित माहिती शेअर करतात. पण, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो 2G च्या काळातील आहे. त्यावेळी सोशल मीडियाचा वापर केला जात नसूनही तो खूप व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. यातील एखादाच व्हिडीओ खूप चर्चेत येतो आणि अनेक वर्षे लोकांच्या लक्षातही राहतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्या व्हिडीओने काही वर्षांपूर्वी काळ गाजवला होता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी ‘झाला हल्ला हल्ला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्या करीत असलेला डान्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक जण 2G च्या काळात हा व्हिडीओ खूप व्हायरल झाल्याचेही सांगताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_epic_jokes या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत एक दशलक्ष ९० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओवर “2G च्या काळात या मुलींनी जे मार्केट गाजवले होते, ते आता 5G च्या काळात कुणालाच नाही जमणार”, असे म्हटले आहे.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, खरंच तेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं, इन्स्टाग्राम नव्हतं, तरीही किती व्हायरल झाला होता हा व्हिडीओ. तर, दुसऱ्या युजरने लिहिलेय की, हा व्हिडीओ आपल्याला आपले वय वाढत जात आहे याची आठवण करून देत आहे. तर आणखी एकाने लिहिलेय की, एक नंबर डान्स. तर आणखी एकाने लिहिलेय की, किती सुंदर डान्स आहे यांचा.