Viral Video: आजकल रील रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर तो पोस्ट करून प्रसिद्ध होणं खूप सामान्य झालं आहे. या एका रीलसाठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात, धोकादायक ठिकाणी जाऊन विचित्र स्टंट करतात आणि स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना आज गुजरातमध्ये घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुण महिंद्रा थार घेऊन समुद्रात उतरले आहेत. रील बनवण्याच्या नादात ते इतक्या खोल पाण्यात गेले की, महिंद्रा थारसह त्यांना बाहेर पडणं शक्य होत नव्हते.

गुजरातमधील कच्छच्या भद्रेश्वरमध्ये ही घटना घडली आहे. दोन तरुणांनी रील शूट करण्यासाठी चक्क समुद्रात जाण्याचे ठरवले. यावेळी रील शूट करण्यासाठी त्यांनी महिंद्रा थारची निवड केली. दोन्ही तरुण महिंद्रा थार घेऊन पाण्यात तर उतरले खरे. पण, असं करणे त्याला चांगलाच महागात पडलं आहे. कारण या दोन्ही महिंद्रा थार समुद्रात अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे आणि काही केल्या तरुणांना थार समुद्रातून बाहेर काढता येत नाही आहेत. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

हेही वाचा…मॉर्निंग वॉकला निघाला हत्तीच्या पिल्लांचा कळप; IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला हत्ती कॅम्पमधील ‘तो’ VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण महिंद्रा थारच्या दोन वाहनांसह समुद्रात उभे असल्याचे चित्र दिसत आहे. या तरुणांनी समुद्रात महिंद्रा थारच्या वाहनांसह इंस्टाग्राम रील बनवण्याचे धाडस केलं खरं… पण, काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या खूप आतमध्ये गेले आहेत. गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी समुद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते वाहनातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, समस्या अधिक गंभीर आहे.त्यानंतर तरुणांनी त्यांची महिंद्रा थार वाहन पाण्याबाहेर काढण्यासाठी धडपडताना दिसले. पण, त्याचा काही उपयोग झालेला दिसून येत नाही आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nizlo___47 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही वेळाने आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने, मेहनतीने महिंद्रा थारची वाहने बाहेर काढण्यात आली. मात्र, ही घटना स्थानिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन चालकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. मुंद्रा सागरी पोलिसांनी कलम २७९, ११४ आणि मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४ अन्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.