Youngsters prank on elderly man viral video: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. एका रीलसाठी कधी आपला तर कधी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू लागले आहेत.

सोशल मीडियावर स्वत:ला रील स्टार म्हणवणारे लोक भररस्त्यात, मेट्रोमध्ये, तर कुठल्यातरी सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ शूट करताना दिसतात. यामध्ये त्यांच्याकडून लोकांना कळत नकळत त्रास होत असतो.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
A old man strangles a dog
‘त्याने प्राण्याचा जन्म घेऊन चूक केली?’ भररस्त्यात श्वानाला गळफास लावला… ; धक्कादायक VIDEO पाहून संतापले नेटकरी
Kanpur couple reels of romance on moving bike
Kanpur Couple Video: रिल बनविण्यासाठी कपलचं बाईकवर अश्लील कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर

हेही वाचा… “आज की रात…”, पेट्रोल पंपावर काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO VIRAL पाहून नेटकरी म्हणाले, “एक नंबर चाचा”,

आता या रील्समध्ये प्रॅंक करण्याचं प्रमाणदेखील वाढत चाललं आहे. मजा म्हणून लोक अनोळखी लोकांची मस्करी करून व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक प्रॅंक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाने सायकल चालवणाऱ्या वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर फोमिंग स्प्रे मारला आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका बाईकवरून जाताना दिसतायत. त्याच रस्त्यावर थोड्याशा अंतरावर वयोवृद्ध त्याच्या सामानासह सायकल चालवत असतात. फक्त मस्करी किंवा प्रॅंक म्हणून बाईकवरील दोन्ही तरुण त्यांची मोटरसायकल घेऊन त्या वयोवृद्ध माणसाजवळ येतात आणि त्यातला एक तरुण वृद्धाच्या चेहऱ्यावर फोमिंग स्प्रे (snow spray) मारतो, यामुळे त्या वयोवृद्धाला दिसेनासं होतं आणि ते वेडीवाकडी सायकल चालवतात. फक्त एका रीलसाठी या दोन तरुणांनी हा प्रॅंक केल्याचं दिसून आलं आहे.

हा व्हिडीओ @SachinGuptaUP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “उत्तर प्रदेशमधील जिल्हा झांसीचा हा व्हिडीओ पाहा. सायकल चालवणाऱ्या वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर स्प्रे करत रील्स बनवणाऱ्या या तरुणांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… रिक्षाने प्रवास करताना सुट्टयांची चिंता मिटली! रिक्षाचालकाने पेमेंटसाठी आणलाय भन्नाट जुगाड, पोस्ट होतेय VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जर या काकांचा तोल गेला असता किंवा काही अनर्थ घडलं असतं तर… अशा नराधमांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “रील बनवायच्या नादात यांच्यामुळे अपघातदेखील होऊ शकतो, अशांवर त्वरित कारवाई केली पाहिजे.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हा कसला जीवघेणा प्रॅंक आहे.”

यासंबंधी पोलिसांनी वयोवृद्धाला त्रास देणाऱ्या तरुणांवर कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ @jhansipolice अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

Story img Loader