आतापर्यंत तुम्ही बाइकवर स्टंट करणारे अनेक तरुण पाहिले असतील. स्टंट करणाऱ्या मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्वतःची हवा करण्यासाठी केलेले हे स्टंट्स अनेकदा या मुलांवरच भारी पडतात आणि त्यांची चांगलीच फजिती होते. केरळमधील दोन मुलांची अशीच फजिती झाली आहे. त्यांनी बाइकवर असा काही स्टंट केला आहे, त्यानंतर आता पोलिसांनीच त्यांना अद्दल घडवली आहे.

ही दोन मुलं आपल्या बाइकवर अशी करामत करत होते की त्यांना पोलिसांनीच ताब्यात घेतलं आहे. खरंतर ही टवाळ मुलं मजा म्हणून बाइकवरून जात असतानाच कपडे काढून अंघोळ करू लागली. त्यावेळी त्यांनी आपल्या अंगाला साबणही लावला होता. ही विचित्र घटना काही वाटसरूंनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या मुलांना ताब्यात घेतलं आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

Viral Video : ‘असा प्रवास नको गं बाई!’ हिमाचल प्रदेशातील खतरनाक घाट पाहून तुमच्याही छातीत भरेल धडकी

केरळमधील एका वृत्तवाहिनीनेही या घटनेचा व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दोन मुलं बाइकवरून जात असतानाच अचानक कपडे काढतात आणि अंगाला साबण लावून अंघोळ करू लागतात. बाइकवर मागच्या सीटवर बसलेल्या मुलाच्या अंगावर आपण साबणाचा फेस पाहू शकतो. मुलांची ही विचित्र कृती पाहून रस्त्यावरील लोकांनाही धक्का बसला.

दरम्यान, केरळमधील कोलम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलांचे नाव अजमल आणि बदुशा असे आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की ते एका स्पोर्ट्स इव्हेंटमधून परतत होते. याचवेळेस मुसळधार पाहून सुरु झाला. गंमत म्हणून दोघांनीही कपडे काढले आणि अंघोळीला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर वाहतूक नियमनाचे उल्लंघन आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल पाच हजारांचा दंड आकारला आहे. दंड भरल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले आहे.

Story img Loader