Viral Video : अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, जन्म महिना, जन्म वर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावरून तुम्ही तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ओळखू शकता. सोशल मीडियावर सुद्धा मनोरंजनाच्या दृष्टीने जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मवर्षावरून व्यक्तीच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या जातात. मुळात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या माहितीला कोणत्याही शास्त्राचा पुरावा नसतो तरीसुद्धआ लोक आवडीने ही माहिती लाईक करतात, शेअर करता आणि त्यावर मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा देतात. (Viral Video: Your Birth Month Reveals Who Loves You Most!)
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जन्म महिन्यावरून कोण आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतं, या विषयी सांगितले आहे.

हेही वाचा : “बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

तुमच्यावर कोण जास्त प्रेम करतं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये वर्षातील बारा महिने लिहिलेले आहे आणि त्याच्या समोर कोण आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतं, ते सुद्धा लिहिले आहे. तुमच्या जन्म महिन्यावरून तुम्ही हे जाणून घेऊ शकता.

जानेवारी – आई
फेब्रुवारी – बहीण
मार्च – वडील
एप्रिल – आई
मे – भाऊ
जून – वडील
जुलै – बहीण
ऑगस्ट – आई
सप्टेंबर – वडील
ऑक्टोबर – बहीण
नोव्हेंबर – वडील
डिसेंबर – आई

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

31_st_creator या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या जन्मतारखेनुसार कोण तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतं?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंय मी माझा वाढदिवस ऑगस्टमध्ये येतो आणि माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते” तर एका युजरने लिहिलेय, “नोव्हेंबर – वडील खरंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला कधीच वडीलांचे प्रेम अनुभवता आले नाही. मिस यू बाबा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : PHOTO: पगारातला एक शून्य कमी झाला अन् तरुणीनं थेट लग्नच मोडलं; तरुणानं रागात पर्सनल चॅट केले व्हायरल, तुम्हीच सांगा खरी चूक कोणाची?

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये मोबाईल नंबरच्या शेवटचा अंकांवरून लोकांचा स्वभाव सांगितला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला होता.