अंकिता देशकर

Your Name photo banner will Flash on Signal: भारतीय रस्त्यांवर प्रवास करताना नियम धाब्यावर बसवून बिनधास्त गाड्या फिरवणारे अनेक जण आपणही पाहिले असतील. आता याच नियम मोडणाऱ्यांना आळा घालण्यासाठी चेन्नई मध्ये आजवरची सर्वात अद्ययावत प्रणाली सुरु करण्यात आल्याचे सांगितले जातेय. या व्हायरल पोस्टमध्ये चेन्नई मधील ‘टेकनॉलॉजिकल इनोव्हेशन’ विषयी माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, सिग्नलच्या वरील बाजूस एक स्क्रीन लावलेली असून ज्या व्यक्तीच्या गाडीने ट्रॅफिकचे नियम मोडले आहेत त्याचे नाव व फोटो त्वरित त्या स्क्रीनवर झळकले जाईल. लाईटहाऊस जर्नालिज्मने या व्हिडिओचा सखोल तपास केल्यावर याबाबत खरी माहिती समोर आली आहे.

vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Women Singing Mere Humsafar Song During Antakshari
VIRAL VIDEO: जेव्हा अंताक्षरीत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही… ‘म’ अक्षरावरून गायलं गाणं, तरुणीच्या आवाजाने नेटकऱ्यांना लावलं वेड
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Aviator Anil Chopra ने आपल्या ट्विटर प्रोफाइल वर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला ४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तपास:

आम्ही सर्वप्रथम व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड केला आणि इंटरनेट वर व्हिडिओचा तपास सुरु केला. इन्व्हिड वरून आम्हाला बरेच किफ्रेम्स मिळाले.

या किफ्रेम्स वर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला Rigged Indian चे प्रोफाइल सापडले. या अकाउंट वर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पिन करण्यात आला होता.

या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये म्हंटले होते: This video is a concept video. Signal tracker in chennai to avoid traffic rules violations. This is a cgi concept video. या पेज ला 76.1K लोक फॉलो करतात. आता हे स्पष्ट झाले होते कि हा एक सीजीआय व्हिडिओ आहे.

CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस) हा VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) चा एक भाग आहे. चित्रपटाच्या अंतिम प्रक्रियेत या व्हीएफएक्सचा वापर केला जातो. पण, CGI आणि VFX एकमेकांशिवाय आणि स्वतंत्रपणे तयार करणे शक्य आहे. आम्हाला या व्हायरल ट्विट वर Greater Chennai Traffic Police यांनी रिप्लाय केल्याचे देखील सापडले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही रिग्ड इंडियन इंस्टाग्राम पेजच्या ऍडमिनशी संपर्क साधला ज्यांनी हा व्हिडिओ खरोखरच एक संकल्पना सादर करण्यासाठी बनवलेला सॅम्पल व्हिडिओ असल्याची पुष्टी केली. हे क्रिएटर्स तंत्रज्ञानाचे मिश्रण करून भविष्यातील नवकल्पना कशा दिसतील हे दाखवणारे व्हिडिओ बनवतात. हा व्हिडिओ अमीर खानने शूट आणि एडिट केला आहे आणि त्यात सय्यद अबरार आणि अब्दुल रझाक यांची मदत मिळाली होती.

हे ही वाचा<< प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीवर आली वाईट वेळ… बस स्थानकातील ‘तो’ Video पाहून डोळ्यात येईल पाणी

निष्कर्ष: चेन्नईमधील सिग्नल ट्रॅकर नावाचा एक संकल्पना व्हिडिओ आहे मात्र आता हा व्हिडिओ खरा म्हणून व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या निर्मात्यांनी देखील हे व्हायरल दावे नाकारले आहेत.