Driving Tips in Marathi : रस्त्यांवर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वारंवार वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याची सूचना करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत::सह इतरांचा जीव धोक्यात टाकतात. वाहना चालताना नेहमी काळजी घेतली पाहिजे विशेषत:: पावसाळ्यात. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना सावध रहा अन्यथा तुमची ही एक चूक कोणाच्या तरी जीवावर बेतू शकते.
पावसाळ्यात वाहन चालवतान काळजी घ्या
पावसाच्या पाण्यामुळे आधीच रस्ते निसरडे झालेले असतात त्यामुळे अनेकदा दुचाकी घसरून पडतात. अनेकदा अचानक घसरून पडलेले दुचाकीस्वार रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनाच्या खाली चिरडले जातात. त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन नेहमी केले जाते.
हेही वाचा – पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा
साचलेल्या पाण्यातून वेगात वाहन चालवू नका
अनेकदा पावसाळ्यात ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले असते. अशा साचलेल्या पाण्यातून जर वेगात वाहन चालवले तर ते पाणी बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या किंवा दुचाकी स्वाराच्या अंगावर उडू शकते ज्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात होऊ शकतो. म्हणूनच साचलेल्या पाण्यातून वाहन नेहमी सावकाश चालवा. दुसर्यांवर पाणी उडून त्यांना त्रास होणार नाही इतक्या वेगाने वाहन चालवा. सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भरधाव वेगाने येणारी कार जोरात पाणी उडवते आणि बाजूने जाणाऱ्या कारच्या काचेवर अचानक पाणी उडते ज्यामुळे समोरचे काही दिसत नाही. सुदैवाने समोर कोणीही नसल्यामुळे आणि चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवल्याने अपघात झाला नाही पण ही चूक तुम्ही कधीही करू नका.
हेही वाचा – पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी
तुमची एक चूक दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकते
व्हिडिओ roadsafetycontent नावाच्या पेजवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, साचलेल्या पाण्यातून पाणी उडून दुसर्यांना त्रास होणार नाही तितक्या वेगाने वाहन घेऊन जावे. वाहन चालवताना तुमची एक चूक तुमचं आणि इतरांचं कुटुंब उध्वस्त करू शकते
व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्याबरोबर अशीच घटना घडल्याचे सांगितले.