तुम्हाला या फोटोमध्ये ‘YOU’RE DOING GREAT AND I’M GLAD YOU EXIST हा संदेश दिसतो आहे का? जरा नीट बघा…..सापडला! नाही ना…तुम्ही म्हणाल की या फोटोमध्ये असे काहीच दिसत नाही. पण मित्रांनो, हा तुमचा भ्रम आहे. या फोटोमध्ये हा संदेश लपलेला आहे फक्त तुम्हाला तो वाचता येत नाहीये कारण हा एक ऑफ्टीकल इल्युजन असलेला फोटो आहे.

मानवी मेंदूला फसवण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन अनेकदा वेगवेगळ्या अँगल आणि आकाराचा वापर करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच एका फोटोमुळे लोक हैराण झाले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका ऑप्टीकल इल्यूजनमध्ये, काळ्या-पांढऱ्या रेषांचा लांबलचक आणि अगदी अरुंद संच दिसत आहे. या फोटोमध्ये एक गुप्त संदेश आहे जो एका नजरेत वाचणे अशक्य आहे. नक्की काय संदेश आहे हे ओळखणे वाटते तितके सोपे नाही. फोटो पाहून तुम्ही हैराण होऊ जाल पण तुम्हाला संदेश काही सहजा सहजी सापडणार नाही. हे एक कोड आहे पण हे कोड सोडवण्यासाठी एक खास युक्ती आहे. चला जाणून घेऊ या सविस्तर.

काय आहे युक्ती?

फोटोत दडलेला संदेश तुम्हाला जर वाचायचा असेल तर तुम्हाला एक छोटीशी युक्ती वापरावी लागेल. हा फोटो मोबाईल फोनच्या स्क्रिनवर उघडा. आता तुमचा फोन आता आडवा करा आणि चार्जिंग पॉईंटपासून फोनच्या स्क्रिनवर असलेल्या या फोटोकडे पाहा. आता तुम्हाला ‘YOU’RE DOING GREAT AND I’M GLAD YOU EXIST’ हा मेसेज स्पष्ट वाचता येईल. Secret Message दिसला ना! हा फोटो पाहून तुम्ही आश्चर्यचिकत व्हाल! आता असे का झाले हे जाणून घेऊ.

हेही वाचा – शोधाल तर सापडेल! ‘या’ फोटोत लपलंय एक लबाड मांजर, समोर असूनही दिसणार नाही, १० सेंकदाचं चॅलेज घ्या

'YOU'RE DOING GREAT AND I'M GLAD YOU EXIST
असा वाचा संदेश ( फोटो – लोकसत्ता लाइफस्टाईल टीम)

असे का घडले?

इंग्रजीमध्ये लिहिलेला हा मजकूर अनैसर्गिकपणे ड्रॅग केला आहे ज्यामुळे डिझाइन मेंदूद्वारे डीकोड करणे कठीण होते. perception आणि angle दोन्ही येथे युक्तीमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. एका विशिष्ट युक्ती वापरून फोटो पाहिल्यास संदेश स्पष्टपणे वाचता येतो. तुमचा फोन थोडा तिरका केल्यानंतर हे समजण्यायोग्य होते. जेव्हा फोटो पाहण्याचा अँगल बदलतो तेव्हाच तुम्हाला लांबलचक इंग्रजी अक्षरे दिसतात.

हेही वाचा – खरे प्रतिबिंब ओळखा? पाण्यात दगड आहे की…. फोटो पाहून चक्रावून जाईल तुमचं डोकं

ऑप्टिकल इल्यूजनवर नेटकऱ्यांनी अशी दिली प्रतिक्रिया

ही युक्ती पाहून कित्येक युजर्स चकित झाले आहेत आणि योग्य उत्तर सांगत काहींनी कमेंट केली आहे. पण हे कोड सोडवणे प्रत्येकासाठी सोपे नव्हते, काहींना ही युक्ती समजली नाही त्यांनी फोटोखाली तो पाहण्यासाठी मदत मागितली. “तुम्ही ते कसे वाचले,” असा प्रश्न देखील एकाने केला आहे.

यामुळे अनेकजण मदत करण्यास पुढे आहे. “तुमचा फोन आडवा करा आणि तळापासून स्क्रिनकडे पहा,” असे एका यूजरने उत्तर दिले. आणखी एकाने लिहिले की , “तुमच्या फोनच्या चार्जिंग पोर्टच्या अँगलने हा फोटो पाहा.” काहींनी आनंददायक प्रतिसाद देखील दिले.

Story img Loader