स्पायडरमॅन म्हणताच क्षणी आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? उंचच भिंत चढणारा, लोकांना वाचवणारा. परंतू या काल्पनिक हिरोसारखंच आपल्याला भिंत सरसर चढता यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण ते प्रत्यक्षात शक्य नाही. तरीही सुद्धा एका तरूणाने धरणाची उंच भिंत चढण्याचा स्टंट करण्याचा प्रयत्न केला खरा. पण हा स्टंट त्याच्याच अंगलट आला. धरणाची तब्बल ३० फूट भिंत चढण्याच्या नादात हा मुलगा उंचावरून धाडकन खाली पडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कर्नाटकमधल्या चिकबल्लापुर जिल्ह्यातला आहे. या व्हिडीओमधल्या तरूणाचं नाव श्रीनिवास सागर असं आहे. ही घटना गेल्या रविवारची आहे. २० वर्षाचा हा तरूण धरणाची जवळजवळ पूर्ण भिंत चढला होता. त्याचा ३० फूट उंच भिंत चढण्याचा हा खतरनाक स्टंट पाहूनच धडकी भरेल. अंगावर काटा येईल. ३० फूटांची ही भिंत चढून उंचावर गेल्यानंतर मात्र याचा मुलाचा तोट सुटतो आणि इतक्या उंचावरून तो थेट खाली कोसळतो. इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर या मुलाचं काय झालं असेल, या विचारानेच मन हेलावून जातं. हे धऱण राज्याची राजधानी बंगळूर पासून ७४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

आणखी वाचा : वडिलांची सेकेंड हॅंड सायकल पाहून आनंदाने उड्या मारू लागला चिमुकला, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : दोन तरूणांमध्ये जबरदस्त फाईट, एकाने कानशिलात मारली तर तर दुसऱ्याने एका बुक्कीत केलं गारद, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला ताबडतोब उपचारासाठी बंगळूर इथल्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ज्यावेळी हा तरूण तिथे स्टंट करत होता, तिथे जवळपास ५० पेक्षा लोक पाहण्यासाठी गर्दी करून उभे होते. परंतू यातलं कुणीही पुढे येऊन त्याला हा स्टंट करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तो भिंत चढतो की नाही हे पाहण्यात सारेच जण दंग राहिले.

आणखी वाचा : Leopard Attack Video: हरणासाठी बिबट्या बनला ‘दगड’, हुशारीने शिकार करायची होती; मग काय झालं, पाहा VIRAL VIDEO

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिल्हा प्रशासनाने धोकादायक कृत्य न करण्याचा इशारा देऊनही भिंत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लोक असे कृत्य न करण्याचं आवाहन करत आहेत.