Viral video: देशाच्या ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जातात आणि दुर्गंधी व रोगराई पसरवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत दूषित होतात आणि डायरियासारखे आजार पसरतात. उघड्यावर शौचास जाणे बंद करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. लोकांना जागरूक केले, प्रत्येक घरात शौचालये बांधली. तरीही काही लोक असे आहेत की ते अजूनही उघड्यावरच शौच करतात. अशाच लोकांना एका तरुणानं अद्दल घडवण्याचं ठरवलं, पण तेही शांततेतून. सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौच करणाऱ्यांना चहा देतोय.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर खुर्चीवर बसलेली दिसत आहे. त्याच्या एका हातात चहाचा थर्मॉस आणि दुसऱ्या हातात माइक आहे. खुर्चीवर बसलेली व्यक्ती माईकवर सांगत आहे की आज रस्त्यावर शौचास आलेले सर्व लोक चहा पिऊन जातील. आज मी पहाटे ४ वाजता सर्वांसाठी चहा बनवला आहे. तरुणाचं बोलणं एकून सगळेच आश्चर्यचकित होत होते. सुरुवातील शौचास येणाऱ्या लोकांना तरुणाचं नेमकं काय चालंलय हेच कळत नव्हतं.
वाचा काय आहे नेमकं प्रकरण
व्हिडिओ शेअर करताना @siddharthgzp ने लिहिले की, “जे आज रस्त्यावर शौच करण्यासाठी आले त्यांच्यासाठी मी चहा घेऊन आलो आहे… तुम्ही शौच करा आणि मग हा चहा प्या.” बाहेर उघड्यावर शौचास येणाऱ्या लोकांमध्ये अनोख्या पद्धतीने जागृती करण्यासाठी तरुणानं हा घाट घातला होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> वाघाशी केली मैत्री; भयानक प्राण्यानेही व्यक्त केले प्रेम, पाहा व्हायरल होणारा थरारक VIDEO
या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकाने लिहिले, ‘९० टक्के लोक शौचालये बांधूनही वापरत नाहीत. काही ठिकाणी तर बहुतेक शौचालये बांधूनही ती वापरली गेली नाहीत. अश्विनी यादव यांनी लिहिले, ‘कृपया टॉवेल, पुष्पगुच्छ, शाल आदी भेट द्या. ‘पाणी, साबण आणि टॉवेलचीही व्यवस्था करा.’ अनुरागने लिहिले, ‘सिद्धार्थ भाई उत्तम उपक्रम!