वाढदिवसाच्या केक तलावारीने कापल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याच्या अनेक बातम्या वाचनात येतात. अनेकदा परवाणगी नसताना भलते साहस करायला जाणाऱ्यांनांना मग पोलिसी खाक्या दाखवावा लागतो. मात्र सध्या व्हायरल होत असणाऱ्या एका व्हिडीओमध्ये काही मुलांनी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क बंदूकीने उडवत वाढदिवस साजरा केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर भलताच चर्चेचा विषय ठरत असून तो उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर चार ते पाच जण गाडीसमोर उभे असल्याचे दिसतात. या मुलांपैकी एकजण काही फुटांवर बाजूच्या फुटपाथवर ठेवलेला केक रस्त्यावर उभा राहून चक्क बंदूकीने उडवताना दिसतो. पहिली गोळी केकला न लागल्या हा मुलगा आणखीन दोन गोळ्या मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ
Cutting cake using knife is such a cliched thing. In this video, a youth is seen taking repeated shots at the cake to ‘cut’ it while others cheer him. The incident is said to have happened in Meerut. pic.twitter.com/DE7yzmOF2V
— Piyush Rai | پیوش رائے (@Benarasiyaa) January 12, 2019
एका वृत्तानुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील जागृतीनगर एक्सटेंशन जवळचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्हायरल व्हिडीओच्या ट्विटवर एकाने उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग केल्यानंतर पोलिसांनी मेरठ पोलिसांना याबद्दल चौकशीची आदेश दिले.
@meerutpolice – Kindly look into it
— UP POLICE (@Uppolice) January 13, 2019
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या ट्विटला मेरठ पोलिसांनी आपल्या हॅण्डलवरून हे प्रकरण मेरठ पोलिसांच्या अखत्यारीमधील नसल्याचे सांगितले आहे.
श्रीमान जी उक्त प्रकरण जनपद मेरठ से सम्बन्धित नही है।
— MEERUT POLICE (@meerutpolice) January 13, 2019
त्यामुळे ही घटना होऊन काही दिवस उलटून गेल्यानंतरही व्हिडीओमधील तरुणांची ओळख पटली नसल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा तरुणांकडून गैरकायदेशीररित्या होत असणाऱ्या हत्यारांच्या वापराचा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे.