मुंबईच्या लोकलला लाईफ लाईन हे नाव का पडलं असेल बरं? लोकलमधून लाखो लोक प्रवास करतात म्हणून? आज या लोकलमधून येणा-या प्रत्येकाची ‘लाईफ’ कदाचित याच ‘लाईन’वर अवलंबून असेल म्हणूनही तिला ‘लाईफ लाईन’ म्हणत असतील. लोकलमध्ये छोट्या मोठ्या वस्तू विकायला येणा-या प्रत्येकाचं आयुष्य या लोकलवरच तर अवलंबून असतं ना! याच लोकलमुळे तर त्यांचं पोटं भरतं, पण काहींसाठी लोकलचं महत्त्व यापलिकडे आहे. डोबिंवलीत राहणा-या एका २० वर्षांच्या मुलाला ही लाईफ लाईन महत्त्वाची वाटते कारण इथून कामावलेल्या पैशातून तो कँन्सरग्रस्त रुग्णासाठी मदत करतो.

वाचा: मुंबई ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत नगरी

डोबिंवलीत राहणारा सौरभ निंबकर फक्त २० वर्षांचा आहे. लोकलच्या प्रवासात आपली गिटार हातात घेऊन तो गाणी गायचा. लोकलमध्ये गाणी गाऊन त्याला जे पैसे मिळायचे ते सारे पैसे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी तो खर्च करतो. बेटर इंडियाने त्याच्यावर एक शॉर्ट फिल्मही बनवली आहे. सौरभच्या आईचा २०१४ मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला होता. आईला उपचारासाठी  रुग्णालयात नेताना सौरभला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे असे अनेक रुग्ण होते ज्यांच्याजवळ उपचारांसाठी पैसेही नव्हते. तेव्हापासून सौरभने या रुग्णासाठी मदत गोळा करण्याचे ठरवले. सुरूवातीला लोकलमध्ये गाऊन त्याला काही पैसे मिळायचे, त्यानंतर अनेक कॉन्सर्टसाठी तो गाऊ लागला. यातून जे काही पैसे मिळतात ते आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी दान करतो असेही त्याने सांगितले.

वाचा: नोकियाचा ‘स्नेक गेम’ फेसबुकवरही येणार

Story img Loader