भारतात क्रिकेटची मोठी क्रेझ पाहायला मिळते. इथे क्रिकेटकडे खेळ म्हणून नाही तर एक भावना म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भारतातील अनेक तरुणांचे सुट्ट्यांचे दिवस हे फक्त क्रिकेटसाठीच ठरलेले असतात. तुम्ही गार्डन किंवा मोकळ्या मैदानात कुठेही गेलात तरी तुम्हाला लोक क्रिकेट खेळताना दिसतील. एवढेच नाही तर अनेक गल्लीबोळात, रस्त्यांवरही लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसतात. याशिवाय खेडेगावातही माळरानात क्रिकेटचे सामने भरवले जातात. पण, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसणारा सामना तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. यात काही तरुण चक्क चिखलात क्रिकेट खेळताना दिसतायत. असा क्रिकेट सामना पाहून काहींना आपल्या बालपणीचे दिवस आठवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, चार तरुणांनी चक्क चिखलात क्रिकेटची खेळपट्टी बनवली आहे. एवढेच नाही, तर या तरुणांनी त्यांच्या संपूर्ण अंगावर चिखल लावला आहे. चिखलाने माखलेल्या अंगानेच ते तिथे क्रिकेट खेळताना दिसतायत. या तरुणांपैकी एक गोलंदाजी, दुसरा फलंदाजी, तिसरा विकेट कीपिंग आणि शेवटची व्यक्ती पंच आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

युजर्सनी केल्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ @krishu_maurya_9612 नावाच्या इ्न्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आता युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने या मजेशीर क्रिकेट सामन्याला KPL (किचड प्रीमियम लीग) असे नाव ठेवले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, त्यांची क्रिकेट खेळण्याची पद्धत थोडी अनौपचारिक आहे. तिसऱ्या युजरने लिहिले- भाऊ, तुम्ही अंपायरला का सोडले? आणखी एका युजरने लिहिले – भाऊ, फलंदाज जडेजासारखा दिसतो.