Viral video: आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यात १३ सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. हे गड-किल्ले पाहायला बाहेरच्या देशातूनही पर्यटक येत असतात. असाच एक पर्यटक न्यूझीलंडवरुन सिंहगड किल्ल्यावर आला होता. यावेळी त्याच्यासोबत तरुणांनी संतापजनक कृत्य केलंय. या तरुणांनी पर्यटकाला भाषेचं ज्ञान नाही हे लक्षात आल्यावर चक्क शिव्या शिकवल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हा एक न्यूझीलंडमधील यूट्यूबर आहे, तो सिंहगड किल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता यावेळी तिथे हा प्रसंग घडला. या व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता, न्यूझीलंडवरुन सिंहगड किल्ल्यावर आलेल्या या पर्यटकाला चक्क शिव्या शिकवत आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. हे गड-किल्ले पाहायला बाहेरच्या देशातूनही पर्यटक येत असतात. परंतु मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लावल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावण्याचे काम करणाऱ्या या माथेफिरु तरुणांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

न्यूझीलंड येथून आलेला एक परदेशी पर्यटक पुण्यातील सिंहगड किल्ला सर करत होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. यावेळी त्याला व्यवस्थित माहिती द्यायची सोडून तरुणांनी विचित्र प्रकार केला. तरुणांच्या टोळक्याने परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरुन त्यांने नकळत शिवीगाळ केलीही, मात्र आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली असावी. त्यानंतर तो पुढे निघून गेला. गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ think__marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. एकानं, “या मुलांना शोधून यांच्यावर कठोर कार्यवाही झालेला एक व्हीडिओ व्हायरल झाला पाहिजे..” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं “माफ करा महाराज, आम्ही तुमचे संस्कार देण्यात अपयशी ठरत आहोत. एक आपले महाराज होते जे गडावरती इंग्रज अधिकारी येणार होते म्हणून गडाच्या किल्लेदारा बोलून त्याला सांगितलं की आपले इंग्रज आपले शत्रू असले तरी ते आज आपले पाहुणे म्हणून गडावरती येणार आहेत त्यांची रहायची आणि जेवणाची सोय करावी आणि त्यांना लागेल ते देऊन त्यांचा सन्मान करून परत पाठवावे असा आदेश महाराजांनी दिला…. आणि आज हा व्हिडिओ बघून महाराज तुमच्या आदेशाला कुठे तरी प्रश्न चिन्ह निर्माण केले गेले… माफ करा महाराज” अशी प्रतिक्रिया दिली आहे.