world cup 2023 final: १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली तो क्षण आता काही तासांवर आला आहे. क्रिकेट विश्वाचा नवीन बादशाह कोण? या प्रश्नाच उत्तर उद्या मिळेल. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार आहे. भारतात क्रिकेटला धर्म, उत्सवाचा दर्जा आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या स्टाइलमध्ये मेन इन ब्लूला सपोर्ट् करतोय. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याच दरम्यान काही उत्साही तरुणांनी वर्ल्डकप फायनलसाठी भन्नाट गाणं तयार केलं आहे. टीम इंडियाला सपोर्ट करणारं हे गाणं एकून तुम्हीही कौतुक कराल. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की, काही तरुण एका बेडवर बसलेले आहेत. या तरुणांनी मस्त असे रंगीबेरंगी कुर्ता पायजामा परिधान केले आहेत. हे खास गाणं भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि संघातील इतर खेळाडूंसाठी बनवण्यात आलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय राहणार नाही. यावेळी हे तरुण कप लायेंगे, कप लायेंगे असं गाणं बोलत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ माकडाने केला वाघाचा मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video

एक लाख ३२ हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमची तिकीटविक्री कधीच संपलेली आहे. तरीही येथील अनेक स्थानिकांनीही आशा सोडलेली नाही. भारतीय संघातील मोजके खेळाडू हलक्या सरावासाठी आज मैदानात आले. तर कोलकत्याहून अहमदाबादमध्ये आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टेडियममध्ये आलेच नाहीत. तरीही स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उत्साही प्रेक्षकांचा गलका वाढतच होता. 