Viral video: लग्नात सासरच्या मंडळींकडून मिळत असलेली नवी कोरी कार नाकारत एका तरुणाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. मात्रही अनेक ठिकाणी ही अघोरी प्रथा सुरु असल्याचं दिसतं. काही ठिकाणी तर हुंडा घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अशा परिस्थितीत स्वतःच्या वर्तनातून समाजापुढं नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा तुमची मुलगी दिली हेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत या तरुणानं कार घेण्यास नकार दिला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवीन कार हॉलच्या बाहेर उभी आहे. “प्रेमळ पित्याकडून चि.सौ.का हर्षिता हिस सालांकृत कन्यादानातील एक खास गोष्ट”. असं पोस्टर कारच्या बाजुला लावलेलं दिसत आहे. मात्र हे पाहून नवरा मुलगा हात जोडून ही भेटवस्तू नाकारतो. मुलीच्या घरच्यांना दुःख देऊन, कर्जबाजारी करून आपण आनंदी होऊच शकत नाही, असं तो म्हणाला आणि ते ऐकून होणाऱ्या पत्नीच्या नजरेत त्याचा आदर कमालीचा वाढला. यावेळी मुलीच्याही चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जात आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या तरुणानं एक नवा आदर्श ठेवला आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक विद्यार्थी भविष्यात हुंडा नाकारतील, अशी अपेक्षा आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक खांब कोसळला अन् क्षणार्धात संपूर्ण पूलच जमिनदोस्त झाला; ३९ सेकंदाच्या VIDEO ने खळबळ

आपला स्वकर्तृत्वावर विश्वास असून स्वतःला विकण्याची इच्छा नसल्याचं या तरुणानं सासरच्या मंडळींना सांगितलं. हुंडा ही अघोरी प्रथा असून जोपर्यंत स्वतःपासून हुंडा नाकारण्याची सुरुवात होत नाही, तोपर्यंत ही प्रथा बंद होणार नाही. त्यामुळे स्वतःपासूनच सुरुवात करण्याचा निर्णय़ आपण घेतला असून इतरांनादेखील आपण हुंडा नाकारण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ ashishadak_makeupartist या अकाऊंडरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तरुणाचं कौतुकही करत आहे.

Story img Loader