Jeevan Kadam Car Tire Burst On Mumbai- Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल तर डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अलीकडेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पहाणीनंतर सांगितले. पावसाळ्यात काम करता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. पण याच मुंबई-गोवा महामार्गाची भयंकर दशा दाखवणारा एका व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध युट्युबर जीवन कदम याने मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करताना आलेला भीषण अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

जीवन कदम याने व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुंबई- गोवा महामार्गावर पायाच्या पोटरीपर्यंत पाणी भरलेले अनेक खड्डे पडल्याचे दिसत आहे. याच खड्ड्यात अडकून जीवनच्या गाडीचा एक टायर फुटला होता. विशेष म्हणजे अशाप्रकारे खड्ड्यात गाडीचा टायर फुटला म्हणून त्याच रस्त्यावर आणखी एक गाडी थांबलेली होती. हा व्हिडीओ शेअर करताना जीवनने हा धोकादायक हायवे अजुन किती लोकांचे जीव धोक्यात टाकणार? असा प्रश्न सुद्धा उभा केला आहे.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम १२ वर्षे रखडले आहे. यातील पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर अशा दोन टप्प्यांत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यातील पळस्पे ते कासू टप्प्यातील १२ किलोमीटरच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी उर्वरीत काम पूर्ण केले जाणार आहे. अशी माहिती जुलै महिन्यात आमदार व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती.

हे ही वाचा<< दादाची डोकॅलिटी! डोक्यावरचा गवताचा भारा सांभाळू की सायकल चालवू? तरुणाचा अस्सल गावाकडचा जुगाड

ऐन गणेशोत्सवात चाकरमानी गावाकडे निघण्याची आस लावून बसले असताना अशा प्रकारची रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी सरकारने कामाचा वेग वाढवणे आवश्यक आहे.

Story img Loader