YouTuber Accident Video : सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे पाहत नाहीत, याची अनेक उदाहरणं आपण सोशल मीडियावर पाहिली आहेत. कधी कोणी उंच टेकडीवर रील बनवता बनवता दरीत कोसळतोय, तर कधी कोणी रेल्वेसमोर उभं राहून स्टंटबाजी करतोय. पण, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका अपघातानंतर जीव धोक्यात असतानाही एक यूट्यूबर व्हिडीओ बनवताना दिसतेय. यूट्यूबरचे अपघातात डोकं फुटलं, त्यात तिच्या मित्राला दुखापत झाली, पण तरीही ती मात्र व्हिडीओ बनवायची काही थांबली नाही. अपघातानंतर रस्त्यावर कोसळ्यापासून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचून औषधोपचार घेईपर्यंत प्रत्येक गोष्टीचा व्हिडीओ बनवून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.

डोक्यातून रक्त वाहतेय पण तरी बनवतेय व्हिडीओ

तुमच्यापैकी अनेकांना YouTuber सीमा कनोजिया आठवत असेल. होय, तीच तरुणी, जी कधी रेल्वेस्थानकावर तर कधी रस्त्याच्या मधोमध उभी राहून विचित्र हावभाव करत नाचते आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. हीच यूट्यूबर सीमा रस्ते अपघातात जखमी झाली. अपघातानंतर झालेल्या जखमांमुळे तिच्या डोक्यातून रक्ताची धार वाहतेय, पण या अपघाताबद्दल आधी चाहत्यांना सांगण्यासाठी म्हणून तिने ताबडतोब मोबाइल काढला आणि सर्व काही रेकॉर्ड केले. यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला आणि तिच्या मित्राला गंभीर जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेले. आश्चर्याची बाब म्हणजे रुग्णालयात जात असतानाही सीमा रुग्णवाहिकेत व्हिडीओ बनवत होती.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

तिच्या पहिल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती रस्त्याच्या कडेला एका एसयूव्ही कारच्या मागच्या चाकाजवळ बसलेली दिसते. हा व्हिडीओ अपघातानंतरचा आहे, पण अपघाताच्या वेळी ती कोणत्या वाहनातून जात होती हे मात्र स्पष्ट झालेले नाही. व्हिडीओमध्ये सीमा रुग्णवाहिकेत बसून बोलत असल्याचे ऐकू येत आहे. “अतिशय वाईट प्रकारे आमचा अपघात झाला. माझे हाड मोडले आहे”, असं ती म्हणत असल्याचेही व्हिडीओत ऐकू येतेय.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस

अपघातात जखमी झालेल्या मित्राचाही बनवला व्हिडीओ

यानंतर लोकांनी तिला आणि तिच्याबरोबर अपघातात जखमी झालेला तिचा मित्र जतीन याला उपचारासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले. यावेळी तो स्ट्रेचरवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत आहे, तर सीमा त्याचे नाव घेत म्हणत होती की, “जतीन गंभीर जखमी आहे. मलाही फ्रॅक्चर झाले आहे”. यानंतर तिने रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये उपचार घेत असतानाचे आणि इतर काही व्हिडीओदेखील अपलोड केले आहेत.

यानंतर तिने आणखी एका व्हिडीओत QR कोड दाखवून जतीनच्या उपचारासाठी पैसे उभारण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, तिचे हे व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेक जण तिला लवकरात लवकर बरं वाटू दे अशी प्रार्थना करत आहेत, तर काही जण हा व्हिडीओ फेक असून तिने प्रसिद्धीसाठी हा अपघाताचा व्हिडीओ बनवला असे म्हणत आहेत. पण, या व्हिडीओंवर तुमची काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला सोशल मीडियावरील कमेंट्स बॉक्समध्ये कळवा.

Story img Loader