आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देत असतो. त्यामध्ये कधी मोबाईल, घड्याळ अशा वस्तूंचा तर कधी मांजर कुत्र्यांसारख्या प्राण्यांचाही समावेश असतो. मात्र, सध्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोला लग्नामध्ये भेट म्हणून गाढव दिल्याची घटना समोर आली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य़ाचा धक्का बसला असेल पण ही खरी घटना असून ती पाकिस्तानात घडली आहे. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध युट्यूबरने त्याच्या बायकोला गाढवचं पिल्लू भेट म्हणून दिलं असून सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाचं म्हणजे या घटनेचा व्हिडिओ स्वत: युट्यूबरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या युट्यूबरचे नाव अजलान शाह आहे, तर त्याच्या पत्नीचे नाव वारीशा असं आहे. अजलानने त्याच्या बायकोला गाढव भेट देण्याचे कारण सांगितलं तो म्हणाला, ‘माझी पत्नी वारीशाला गाढवाचे पिल्लू खूप आवडते. शिवाय गाढव हा जगातील सर्वात गोंडस आणि मेहनती प्राणी आहे.’

हेही वाचा- सावधान! सोशल मीडियाद्वारे ओळख नंतर भावनिक ब्लॅकमेलिंग, एकाच आरोपीकडून १५५ महिलांची फसवणूक

अजलान शाह हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अलीकडेच त्याने वारीशाशी लग्न केले. लग्नानंतर आयोजित रिसेप्शनमध्ये अजलानने वारीशाला तिच्या आवडते गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिलं. तर आता हे दोघे आणखी एक गाढवाचे पिल्लू दत्तक घेण्याचा विचार करत असल्याचंही बोललं जातं आहे.

म्हणून गाढव भेट दिलं –

अजलानने आपण पत्नीला गिफ्ट म्हणून गाढवाचं पिल्लू का दिलं याचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘मला माहित होतं की वारीशाला गाढवांची पिल्लं खूप आवडतात, म्हणून मी तिला ते गिफ्ट म्हणनू दिलं.’ तर अजलानची पत्नी वारीशाने सांगितलं की, ‘मी या गाढवाला फक्त गाढव नाही राहू देणार.’ दरमम्या, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या दोघा नवविवाहीत पती-पत्नीने ‘एक मैं और एक तू, दोनो मिले इस तरह…’ आणि ‘मेरे मेहबूब मेरे सनम, अशा अनेक बॉलिवूड गाण्यांवर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

युट्युबर अजलान शाहने सांगतिलं की त्यांनी गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे केलेलं नाही. तो त्याच्या आईला देखील बरोबर घेऊन आला आहे. त्यांनी गाढवाचं पिल्लू आणि त्याच्या आईला ३० हजार रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. शिवाय या दोघांनाही आता कष्टाची कामं करावी लागणार नाहीत. बीबीसीशी संवाद साधताना अजलानने सांगितले की, माझ्याप्रमाणे वारीशाही प्राणीप्रेमी असून मी तिला हे सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. लोक या गिफ्टबद्दल काय विचार करतात याचं मला काही देणं घेणं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber azlan shah gave a donkey to his wife as a wedding gift jap
Show comments