Shocking Crime Viral News : एका यूट्यूबरने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या यूट्यूबरने प्रियकराची निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस समुद्रात फेकली. ही भयानक घटना थायलॅंडमध्ये घडली असून हत्येचा आरोपाखाली या यूट्यूबर व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. रिपोर्टनुसार, डॅनियल सांचो ब्रोंचलो असं आरोपीचं नाव असून अॅडिवर अॅरिएटा आर्टेगा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी थायलॅंडच्या कोह फांगनान बेटावर प्लास्टिक सर्जनची हत्या केल्याचा आरोपली लावला आहे. आर्टेगाच्या शरीराचे काही तुकडे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, २९ वर्षांच्या डॅनियलचे सोशल मीडियावर १२४०० फॉलोअर्स आहेत. तो ३१ जुलैला थाय रिसॉर्टमध्ये होता. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याचं कोलंबियाई प्रियकरासोबत भांडण झालं होतं. हे दोघे एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. हे कपल फूल मून पार्टीत सामील होण्यासाठी एका बेटावर गेले होते, असं बोललं जात आहे. डॅनियलने त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्याआधी त्याच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने प्रियकर गायब झाल्याची तक्रार दाखल केली.

नक्की वाचा – मुंबईत दिसली जलपरी! ‘वरळी सी लिंक’ ते ‘गेटवे ऑफ इंडिया’ एका दमात पोहली, ३६ किमीचं अंतर केलं पार, पाहा VIDEO

बॅंकॉक पोस्टच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, डॅनियलने एडविनच्या शरीराचे तुकडे समुद्रात फेकले होते. गोताखोर समुद्रात गेल्यावर त्यांना एडविनच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. त्याआधी पोलिसांनी डॅनियलला ताब्यात घेऊन समुद्रावर तपास सुरु केला होता, त्यावेळी पोलिसांना एडिवनचा मृतदेह सापडला. मूळचा स्पेनचा रहिवासी असलेल्या डॅनियलला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी डॅनियलला थायलॅंडच्या न्यायालयात हजर केलं होतं. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हत्येचा कट आणि मृतदेह गुपचूप नष्ट करण्याचा आरोप लावला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber celebrity kills boyfriend and chopped his body and kept in suitcase police found dead body inside sea crime news viral love sory nss