Gaurav Taneja Divorce News: ‘फ्लाईंग बीस्ट’ (Flying beast) नावाने प्रसिद्ध असलेला यूट्यूबर गौरव तनेजा अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. गौरव सोशल मीडियावर फॅमिली व्लॉग, तसेच पत्नी रितू राठीबरोबरचे अनेक रोमँटिक क्षण शेअर करीत असतो. पण, अलीकडेच त्यांच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव असल्याची अफवा पसरतेय. दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत, अशी चर्चादेखील रंगलीय. सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चांदरम्यान आता गौरव तनेजाने याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गौरव तनेजाने लिहिले, “जोई जोई प्यारो करे सोई मोहे भावे” म्हणजे “जे माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो.”
तसेच, आपल्या कुटुंबाची आणि मुलांची गोपनीयता राखण्याची इच्छा व्यक्त करत, त्याने या पोस्टला असं भलंमोठं कॅप्शन दिलंय.
“मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या मुलाच्या आईसाठी शांत राहीन. सर्व नकारात्मकता आणि द्वेषासह मी माझं संपूर्ण आयुष्य जगण्यास तयार आहे. पण, कृपया तुम्ही कोणत्याही स्पष्टीकरणाची अपेक्षा करू नका.”
गौरव तनेजाने पुढे स्पष्ट केले की, “पुरुषांना अनेकदा खलनायक बनवले जाते. आम्ही रडत नाही, कमी बोलतो आणि व्यक्तदेखील कमी होतो. आमच्यापैकी अनेक जण असेच आहेत. सोशल मीडिया हे कौटुंबिक विषयांवर चर्चा करण्याचे ठिकाण नाही. मला काही म्हणायचे नाही. आशा आहे की, लवकरच सर्व काही व्यवस्थित होईल. माझ्या आधीच्या जन्मातील आणि या जन्मातील खूप पापे एकत्र झाली आहेत. ही देवाची कृपा आहे की, याच जन्मात तो माझी सारी पापे नष्ट करतोय.”
“प्रामाणिकपणे मला काहीही पोस्ट करावेसे वाटत नाही; पण मला माझ्या काही कमिटमेंट्स पूर्ण करायच्या आहेत आणि ते माझे काम आहे. मी आधीच शॉट केलेले काही कॉन्टेन्ट पोस्ट करणार आहे. माझ्या वैयक्तिक समस्यांमुळे मी इतरांना त्रास होऊ देऊ शकत नाही. तर, त्याबद्दल मला माफ करा.”
यादरम्यान वैयक्तिक अडचणी असूनही, गौरव तनेजाने त्याच्या चाहत्यांना आश्वासन दिले की, तो नेहमीप्रमाणे कॉन्टेन्ट तयार करेल आणि शेअर करेल.
गुगलवर गौरव तनेजाला केलं जातंय सर्च
गौरव तनेजाच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे अनेकांनी त्याच्याविषयी गुगलवर सर्च केलं आहे. गुगल ट्रेन्ड्सवर मिळालेल्या माहितीनुसार २९ सप्टेंबर २०२४ रोजी gaurav taneja हा कीवर्ड दुसऱ्या क्रमांकावर होता.
कोण आहे गौरव तनेजा?
गौरव तनेजा हा एक लोकप्रिय YouTuber आहे; ज्याने IIT खरगपूरमधून बॅचलरची पदवी घेतली आहे. त्याने पायलट म्हणून प्रथम इंडिगो आणि नंतर एअर एशिया, अशी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या वैमानिक कारकिर्दीव्यतिरिक्त तनेजा एक प्रमाणित पोषण तज्ज्ञ व प्रोफेशनल बॉडीबिल्डरदेखील आहे. तो तीन YouTube चॅनेल चालवतो : “फ्लाईंग बीस्ट”, “फिट मसल टीव्ही” व “रासभरी के पापा”. जिथे तो फिटनेस आणि पोषणाशी संबंधित कन्टेन्ट शेअर करतो, तसेच व्लॉग्सदेखील शेअर करतो.
दरम्यान, गौरव तनेजाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाले, तर त्याचे लग्न रितू राठीशी झाले आहे, जी एअरबस A320 वर कॅप्टन म्हणून काम करते. त्यांना कियारा व पिहू या दोन मुली आहेत.