भन्नाट टॅलेंट असलेल्या काही जणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि अनेकांच्या भुवया उंचावतात. दिवसेंदिवस व्हायरल होणारे व्हिडीओ थक्क करुन जातात. पण यापलीकडेही एक व्हिडीओ असा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावाल. कारण हा व्हिडीओ हवेतला नाही, जमिनीवरचा नाही, रस्त्यावरचा नाही तर चक्क समुद्राच्या खोल पाण्यातील आहे. ब्रिस्टॉलचा युट्यूब स्टार जो जेनकीन्स नेहमी अनेक ठिकाणी पियानो वाजवतो. पण यावेळी त्यांने वाजवलेला पियानो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. कारण जेनकीन्सने यावेळी चक्क समुद्राच्या पाण्यात जाऊन पियानो वाजवला. त्याचा हा जबरदस्त टॅलेंट कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

जेनकीन्सने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. “मी पियानो वाजवला, समुद्राच्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात” असं कॅप्शन त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे. संपूर्ण शरीराला कव्हर करेल अशा डायविंग गियर कॉश्च्यूमसह ऑक्सीजन सिलिंडर लावून जेनकीन्सने समुद्रात उडी घेतली. त्यानंतर त्याने पियानोवर द लिटल मरमेड कारटूनची धून वाजवली. बीबीसीसोबत बोलताना जेनकीन्स म्हणाला, मी समुद्राच्या पाण्यात डुबकी मारून पियानो वाजवला. अखेर मी हे करुन दाखवलं. समुद्राच्या पाण्यात पियानो वाजवणारा मी पहिला व्यक्ती आहे, असा दावा त्यानं केला आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

नक्की वाचा – Optical illusion: या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय, हत्तींची संख्या सांगण्यात ९९ टक्के लोक झाले फेल, तुम्ही सांगू शकता का?

इथे पाहा व्हिडीओ

या भन्नाट व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, “तुम्ही माझे हिरो आहात.” “तुम्ही मनापासून सादर केलेली जबरदस्त कला मला खूपच आवडली”, असं दुसऱ्या एकानं म्हटलं. तुझ्यात खरंच असा वेडेपणा आहे, मला आश्चर्य वाटलं आहे.” असंही अन्य एका युजरने म्हटलं. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या लाईक्सही वाढत आहेत. समुद्राच्या पाण्यात जाऊन पियानो वाजवण्याची कला पाहून अनेक जण संगीताच्या सागरात बुडाले आहेत.

Story img Loader