MrBeast Buys Neighborhood For Employees : प्रत्येक कंपनीच्या बॉसला असे वाटत असते की, त्याचे कर्मचारी ऑफिसपासून जवळ राहणारे असावेत, जेणेकरून कधी गरज भासल्यास त्यांना तात्काळ ऑफिसला बोलवता येईल. यासाठी लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक कंपन्या जवळपासच्या परिसरात राहण्याची व्यवस्था करतात. मात्र एका कंपनीच्या बॉसने कर्मचाऱ्यांसाठी जे काही केले पाहून, वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या यूट्यूबर बॉसने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत एकत्र राहण्यासाठी कंपनीच्या जवळचा संपूर्ण परिसर विकत घेतला आहे. या बॉसची ही युक्ती आता अनेकांना आवडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसिद्ध यूट्युबर जिमी डोनाल्डसन, ज्याला मिस्टर बीस्ट (Mr Beast) या नावाने ओळखले जाते. त्याने उत्तर कॅरोलिना परिसरात स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एका परिसरातील अनेक घरे विकत घेतली आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर मिस्टर बीस्ट याचे यूट्यूबवर १५१ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. अवघ्या २५ वर्षांचा मिस्टर बीस्ट समाजकार्य आणि व्यसनमुक्तीवर व्हिडीओ बनवण्यासाठी ओळखला जातो. त्याचे व्हिडीओ ४० बिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत. यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या हँडल्समध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. केवळ यूट्यूबवर व्हिडीओ बनवून तो आता अब्जाधीश झाला आहे.

शेजाऱ्यांना विकायचे नव्हते घर तरीही…

अब्जाधीश असूनही बीस्टने फक्त पाच घरे विकत घेतली आहेत आणि तीही अगदी माफक किमतीत. ही घरे पाहून तुम्हाला वाटणारच नाही की, ही कोणा करोडपतीची घरे आहेत. खरे तर, याच ठिकाणी हा यूट्यूबर लहानाचा मोठा झाला. त्याचे चार बेडरूम, चार बाथरूम असलेले हे दुमजली घर अंदाजे ३००० चौरस फुटांवर पसरलेले आहे. तर त्याने खरेदी केलेली इतर घरे ही सामान्य आहेत. ही घरे खरेदी करताना त्याच्या डोक्यात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र ठेवण्याचा विचार आहे. यानंतर त्याने आता त्या परिसरातील शेजाऱ्यांची घरेही विकत घेतली आहेत. कर्मचाऱ्याप्रतिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने या घरांसाठी बाजारभावापेक्षा जास्त पैसे मोजले आहेत. यात विशेष म्हणजे ज्या घरांची बीस्टने खरेदी केली आहे ती घरे लोकांना विकायची नव्हती. पण बीस्टने त्यासाठी किमतच एवढी जास्त ठेवली होती की, लोकांना आपली घरे विकावी लागली.

वेटरला टीप म्हणून दिली होती कार

काही वेळापूर्वी मिस्टर बीस्टचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने आपली कार वेटरला टीप म्हणून दिली होती. मिस्टर बीस्ट एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. जिथे त्याने एका महिला वेटरला विचारले की, तिला आतापर्यंत किती टीप मिळाली आहे. यावर महिला वेटरने सांगितले की, ५० डॉलर. म्हणजे सुमारे ४ हजार रुपये. यावर मिस्टर बीस्टने तुम्हाला कोणी कार टिप दिली आहे का? एवढा प्रश्न विचारत थेट तिच्या हातात कारची चावी देऊन तो निघून गेला. ती कार पाहून त्या महिला वेटरलाही रडू कोसळले