लोकप्रिय नेटफ्लिक्सवरच्या कोरियन शो स्क्विड गेमचा अनुभव घेण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. चाहत्यांनी डॅल्गोना कँडी बनवण्याचा प्रयत्न केला, स्क्विड गेमचे कपडे खरेदी केले आणि दुबईमध्ये एक वास्तविक जीवनातील स्क्विड गेम इव्हेंट देखील झाला. या गेमची क्रेझ कदाचित कमी झाली असेल पण युट्यूबर मिस्टरबिस्टने आता रिअल-लाइफ स्क्विड गेम तयार करत होस्ट केला. स्क्विड गेमसारखा हुबेहुब हा गेम खेळला गेला.
MrBeast द्वारे आयोजित वास्तविक जीवनातील स्क्विड गेममध्ये नेटफ्लिक्स शो प्रमाणेच ४५६ स्पर्धक सहभागी झाले होते. गेमची सुरुवात ‘रेड लाइट ग्रीन लाइट’ गेमने करण्यात आली. शोमध्ये पात्र नसलेल्या खेळाडूंना मारले जाते, मात्र MrBeast ने त्यांच्या शर्टमध्ये एक उपकरण घातले होते ते बाद झाल्यावर पॉप होते. खेळ पुढे गेल्यानंतर प्रत्येक खेळाडूला त्यांना दिलेला आकार कोरावा लागतो. त्यानंतर एकापाठोपाठ एक करत इतर गेम खेळले गेले. प्रत्येक खेळानंतर खेळाडूंची संख्या कमी होत स्पर्धा पुढे गेली. अंतिम फेरीत ४,५६,००० डॉलर्स बक्षीस रकमेसाठी सहा खेळाडू पोहोचले होते. पण स्क्विड गेम खेळण्याऐवजी मिस्टर बिस्ट अंतिम सहभागींना संगीत खुर्ची खेळायला लावतो आणि ०७९ क्रमांकाचा खेळाडू जिंकतो त्याला बक्षीसाची रक्कम दिली गेली. मोठ्या काचेच्या बाउलमध्ये ही रक्कम ठेवली होती. विजेत्याने हातोड्याने काचेचा बाउल फोडत रक्कम घेतली.
स्क्विड गेमचा सेटअप जवळजवळ नेटफ्लिक्स शो सारखा आहे. ज्यामध्ये MrBeast ‘द फ्रंट मॅन’ सारखा अभिनय करतो. तसेच लाल जंपसूटमधील गार्ड्स खेळात सहभागी होत सहकार्य करतात. MrBeast च्या Squid गेम व्हिडिओला आधीच २८ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.