Youtuber Accident Video Viral : तामिळनाडूच्या कांचीपूरममध्ये अपघाताच्या एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. यूट्यूबर टीटीएफ वासन चेन्नई-बंगळुरु महामार्गावर दुचाकी स्टंट करताना जखमी झाला. खतरनाक स्टंटबाजी करत असताना तोल गेल्याने त्याचा अपघाता झाल्याची माहिती समोर आलीय. कांचीपूरम जिल्ह्यातील बलूशेट्टी छातीराम या ठिकाणी हा भयानक अपघात झाल्याचं समजते आहे. यूट्यूबरच्या अपघाताचा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, वेगाने धावणाऱ्या दुचाकीवर स्टंटबाजी करण्याचा या वासनने प्रयत्न केला. सर्व्हिस रोडवर दुचाकीची स्टंटबाजी करताना त्याचा तोल गेला आणि भीषण अपघात झाला. दुचाकीचा अपघात झाल्यानंतर पाठीमागच्या दिशेनं एक कार वेगाने रस्त्यावरून जात असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दुचाकीचा पुढच्या चाकावर (Wheelie) स्टंट मारतान वासनचा तोल गेला आणि स्पोर्ट्स बाईकचा रस्त्यावरच चक्काचूर झाल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – मुंबईच्या रस्त्यावर आता ‘डबल डेकर’ बस धावणार नाही! शेवटच्या प्रवासात ‘अशी’ सजली लालपरी, Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

यूट्यूबर वासन अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीन नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वासन याआधीही स्टंटबाजी करताना अपघाताला बळी पडल्याचं समोर आलं आहे. रील्स बनवून लोकप्रिय होण्यासाठी तरुणांनी दुचाकीवर स्टंटबाजी करून जीव धोक्यात टाकू नये, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून नेहमीच करण्यात येतं. पण काही तरुण वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून अपघाताला आमंत्रण देतात आणि अशाप्रकारच्या अपघाताच्या धक्कादायक घटना घडतात.