भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला भारतीय संघातून खेळायचे होते. तो तंदुरूस्तदेखील होता पण निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याबाबत गांभीर्य दाखवले नाही, असा गौप्यस्फोट त्याने काही दिवसांपूर्वी केला. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. ते प्रकरण हळूहळू थंड होत असतानाच आता युवी एका नव्या विषयामुळे चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या मुलाखतीत युवीने गौप्यस्फोट केला होता, त्यावेळी तो दाढी वाढवून त्या कार्यक्रमात आला होता. पण त्यानंतर लगेचच युवीने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत युवीने दाढी काढल्याचे दिसले. त्याने त्याच्या या फोटोला ‘चिकना चमेला’ असे कॅप्शन दिले. याशिवाय त्याने ‘आता लूक चांगला दिसतोय की मी पुन्हा दाढी वाढवायला हवी?’ असा चाहत्यांना सवाल केला.

या फोटोवर चाहत्यांच्या संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. पण टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने केलेली कमेंट मात्र भाव खाऊन गेली. “हनुवटीखाली येणारी दुसरी हनुवटी लपवण्यासाठी तु ‘पाऊट’ करतो आहेस का?”, अशी कमेंट करत सानियाने युवराजची फिरकी घेतली. तसंच तू दाढी वाढवूनच अधिक चांगला दिसतोस. पुन्हा दाढी वाढवायला सुरूवात कर”, असंही तिने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं.