इंटरनेटवर सतत कोणता ना कोणता ट्रेण्ड सुरु असतो. मध्यंतरी फेसअ‍ॅपने नेटकऱ्यांना वेड लावले होते. काही वर्षांनंतर म्हतारे झाल्यावर एखादी व्यक्ती कशी दिसेल हे फोटोच्या माध्यमातून दाखवणाऱ्या या अ‍ॅपची जगभरात चर्चा होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे काम करणाऱ्या या अ‍ॅपवरुन अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांनी आपण म्हतारपणी असे दिसू म्हणत आपले ओल्डएज फिल्टर लावलेले फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले होते. असे एआयवर काम करणारे आणखीन एक अॅप्लिकेशन सध्या चर्चेत आहे. या अ‍ॅप्लिकेशन नाव आहे झाओ (ZAO)

काय आहे हे अ‍ॅप्लिकेशन

चीनमध्ये शुक्रवारी लोकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले झाओ हे अ‍ॅप अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाले आहे. अवघ्या एका दिवसामध्ये हे अॅप्लिकेशन चीनमधील अ‍ॅपस्टोअरवरील पहिल्या क्रमांकाचे अ‍ॅप्लिकेशन झाले आहे. अनेकांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले आहे.

काय आहे हे अ‍ॅप्लिकेशन

हे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे एखाद्या सिनेमामधील दृष्यांमध्ये प्रमुख अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या चेहऱ्याऐवजी युझर्स स्वत:चा चेहरा लावू शकतात. त्यामुळे त्या सिनेमामध्ये खऱ्या खुऱ्या अभिनेत्यांऐवजी आपणच असल्याचे युझर्सला दिसले. अवघ्या आठ सेकंदांचे व्हिडिओ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तयार करुन आपल्या मित्रांबरोबर शेअर करता येतात. एआयच्या मदतीने या अ‍ॅप्लिकेशनमध्ये युझर्सचा चेहरा चित्रपटातील कलाकारांच्या चेहऱ्याशी साधर्म्य साधणारा असेल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे त्या कलाकाराच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि कृती सर्वांचेच अचूक अनुकरण झाल्याचे व्हिडिओत दिसते.

असे असले तरी या अ‍ॅप्लिकेशनच्या सुरक्षेसंदर्भात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डेटा सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी चीनमधील स्मार्टफोन युझर्स या अ‍ॅप्लिकेशनच्या प्रेमात पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळेच अवघ्या तीन दिवसांमध्ये लाखो लोकांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याचे चित्र दिसत आहे.

Story img Loader