YouTuber Zara Dar pornhub income: युट्यूबर जारा डार ही काही दिवसांपूर्वी रातोरात चर्चेत आली होती. पीएचडीचा अभ्यास सोडून तिनं ओनली फॅन्स या संकेतस्थळावर ॲडल्ट कन्टेंट क्रिएटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण आता ती स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) विषयाचे व्हिडीओज बनवून ते पॉर्नहब आणि युट्यूबवर अपलोड करत असल्याचा खुलासा केला आहे. मात्र युट्यूबपेक्षा पॉर्नहबवर या व्हिडीओला अधिक पैसे मिळत असल्याचेही तिनं सांगितलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून तिनं आपल्या उत्पन्नाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युट्यूबकडून किती पैसे मिळतात?

जारा डारनं एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिनं म्हटलं की, मी STEM विषयाशी निगडित व्हिडीओ प्रसिद्ध ॲडल्ट संकेतस्थळ पॉर्नहब आणि युट्यूबवर पोस्ट करत आहे. युट्यूबवर व्हिडीओना व्ह्यूज अधिक मिळतात. पण पॉर्नहबवर एक दशलक्ष व्ह्यूजला मिळणारे उत्पन्न युट्यूबपेक्षा अधिक आहे. एक्सवर जारानं एका व्हिडीओचा स्क्रिनशॉटही टाकला आहे. ज्यामध्ये पॉर्नहबवर एक दशलक्ष व्ह्यूजच्या बदल्यात १००० डॉलर (८६ हजार रुपये) मिळाल्याचे दिसत आहे. तर युट्यूबवर तेवढ्याच व्ह्यूजसाठी ३४० डॉलर (जवळपास २९ हजार) मिळाल्याचे दिसत आहे.

जारा डारच्या या पोस्टवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पॉर्नहब साईटवर जाऊन मला आज नवीन काहीतरी शिकायला मिळाले, असं एकानं म्हटले आहे. तर आणखी एका युजरनं म्हटलं की, ॲडल्ट संकेतस्थळावर जाऊन मशिन लर्निंग किंवा एआयची माहिती देणारे व्हिडीओ कोण पाहतात? तर एका युजरनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणिताशी निगडित व्हिडीओ इतके लोकप्रिय असतात, हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे.

जारा डारनं पीएचडी सोडून कंटेट क्रिएटरचं काम निवडलं

LinkedIn नं केलं बॅन

जारा डारनं पुढं म्हटलं की, मी एक्सवर टाकलेली पोस्ट LinkedIn वरही शेअर केली होती. LinkedIn वरील माझी पोस्ट बरीच व्हायरल झाली. पण त्यानंतर आता त्यांनी माझे अकाऊंट ब्लॉक केलं आहे.

डिसेंबर महिन्यात जारा डारनं पीएचडी सोडून ओनली फॅन्सवर जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचं मला दुःख वाटत नसून आर्थिकदृष्ट्या हा निर्णय अधिक चांगला असल्याचं तिचं म्हणणं आहे.