सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एका टी-शर्टवरून वाद घालताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा आहे, ज्यामध्ये दोघेही ‘झारा’च्या टी-शर्टवरून वाद घालताना दिसत आहेत. या व्हिडीओनुसार, मुलगी एक टी-शर्ट आणते, ज्याची किंमत हजार रुपये आहे. यानंतर मुलगा म्हणतो की या टीशर्टची किंमत दीडशे रुपयांपेक्षा जास्त नाही! मुलीला याचा राग येतो, त्यानंतर ती त्या मुलावर हात उगारते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर मुलगा तिला हात न उगारण्याची चेतावणी देतो आणि आपण सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे भान राखण्यास सांगतो. यानंतर, मुलगी पुढे जाताच तो तिला तिथून निघून जाण्यास सांगतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो आणि ती त्याला एका मागोमाग एक थप्पड मारते.

हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलगा म्हणतो, ‘तू गप्प बस, माझ्यासमोरून निघून जा.’ यानंतर मुलगी गेटजवळ येते आणि ‘माझ्या आयुष्यात येऊ नकोस’ असे म्हणते आणि त्यानंतर त्या मुलाला आणखी एक थप्पड मारते. यावेळी तो मुलगा बदला घेत मुलीला थप्पड मारतो आणि म्हणतो, ‘थांब, तुला सांगतो.’ हे बोलल्यावर मुलगी त्याला पुन्हा थप्पड मारते आणि म्हणते, ‘मी आईला सांगेन…तुझ्यासारखा मुलगा कोणालाही न मिळो.’ यानंतर मेट्रोचा दरवाजा उघडतो आणि दोघे निघून जातात.

MDH मसाल्यांना मिळाला नवा चेहरा; जाणून घ्या जाहिरातीत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण

या व्हायरल व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका ट्विटर युजरने दिल्लीतील चांगली आठवण सांगून दिल्लीला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला, तर दुसऱ्या युजरने लिहिले की प्रेमात असे चालते. यासोबतच एका यूजरने याला ‘वाइल्ड लव्ह’ म्हणत, ‘अह गजब का प्यार है! त्याला वाइल्ड लव्ह म्हणतात.’ अशी कमेंट केली आहे. यासह, लोक अजूनही वेगवेगळ्या कमेंट करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zara t shirt became the reason for couple fight in delhi metro the video of the brawl is going viral pvp