Viral video: जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना एक सुखद अनुभव घेता आला आहे. सध्या सोशल मीडियावर अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांना भुरळ घातली आहे. यात झेब्राच्या प्रसूतीचे काही अद्भूत क्षण पाहायला मिळाले आहेत.

‘जन्म बाईचा बाईचा, एक आईचा, माय ही सांगे अर्थ मायेचा…’ स्त्रीला मिळालेल्या मातृत्वाच्या वरदानाचे किती सुंदररीत्या वर्णन केले आहे. असे म्हणतात, एक स्त्री जन्माला येते आणि संपूर्ण पिढीचा पिढी वाढवून उद्धार करते. प्राणीही या मातृत्त्वाचा अनुभव घेत असतात. मात्र हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

एक पर्यटक सफारीदरम्यान आपल्या गाडीतून फिरत असते. यावेळी तील समोर एक सुंदर दृश्य दिसते. ती पाहते की, समोर एक जिराफ बाजूला उभा आहे, त्याला बाजूला सारत ती पुढे जाते मात्र पुढच्याच क्षणी तिच्या नजरेस एक झेब्रा येतो, जो आपल्या बाळाला जन्म देणार असतो. हे समजताच ती आपली गाडी दुरवर थांबवते आणि हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेरात कैद करु लागते. झेब्राच्या प्रसूतीचे अद्भूत दृश्य ती पाहतच राहते आणि त्याचा व्हिडिओही बनवते. यात पुढे आपण पाहू शकतो की, प्रसूतीदरम्यान झेब्राला किती वेदना होत आहेत ते स्पष्टपणे दिसत आहे, म्हणूनच म्हणतात मातृत्व सोपे नाही. पुढे नवीन जन्माला आलेला झेब्राचा मुलगा जन्मताच आपल्या पायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला काही ते जमत नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओupwardwithamy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, सगळ्यात सुखद अनुभव आणि नशीबवान पर्यटक तर आणखी एकानं मातृत्व सोपे नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader