मागील काही दिवसांपासून झिम्बाब्वे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये क्रिकेट सोडून वेगळ्याच विषयावर शाब्दिक वाद सुरु होता. दोन्ही देशांमध्ये ‘मिस्टर बीन वाद’ बराच चर्चेत आहेत. आता याच वादाला सोशल मीडियावर पाकिस्तान झिम्बाब्वे सामन्यात नवीन फोडणी मिळाली आहे. इतकच काय तर अगदीच अनपेक्षितरित्या पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेच्या पंतप्रधानांनीही या वादाचा संदर्भ देत सामन्यानंतर पाकिस्तानला ट्रोल केलं आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला झिम्बाब्वेने गुरुवारी अगदी शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभूत केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी ही पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> पाकिस्तान T20 World Cup मधून जवळजवळ बाहेर! मात्र भारताच्या हाती आहे पाकच्या सेमी फायनलचं तिकीट; समजून घ्या Points Table

अवघ्या एका धावेने झिम्बाबेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील एका धक्कादायक निकालाची नोंद केली. रविवारी (२३ ऑक्टोबर २०२२ रोजी) झालेला भारताविरुद्धचा सामनाही पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर गमावला होता. त्यानंतर गुरुवारी अवघ्या १३१ धावांचं लक्ष्यही पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानला निर्धारित २० षटकांमध्ये १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानचा हा ‘सुपर १२’ फेरीतील सलग दुसरा पराभव असून आता त्यांची उपांत्यफेरीसाठी पात्र ठरण्याची धुरस शक्यता आहे. झिम्बाब्वेसारख्या दुबळ्या संघाकडून पराभूत झाल्याने पाकिस्तानला ट्रोल केलं जात आहे.

नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर

पार्थच्या मैदानावर झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी ट्वीटरवरुन आनंद व्यक्त करताना खोचक शब्दांमध्ये पाकिस्तानला डिवचलं. पाकिस्तानने यापुढे तरी खरा मिस्टर बीन पाठवावा अशी अपेक्षा मनंगाग्वा यांनी व्यक्त केली. “फारच भन्नाट विजय मिळला झिम्बाब्वेला! अभिनंदन संपूर्ण संघाचं. पुढील वेळेस खरा मीस्टर बीन पाठवा…” असं मनंगाग्वा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे हा हॅशटॅगही वापरला.

नक्की पाहा >> विराट कोहलीचा मराठीत रिप्लाय! सूर्यकुमार यादवबरोबरच्या मैदानाबाहेरची पार्टनरशीप अन् ‘त्या’ कमेंट्सची तुफान चर्चा

नक्की पाहा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

पाकिस्तानी बीन प्रकरण काय?
पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरुन हा वाद सुरु झाला. पाकिस्तानी संघ झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी तयारी करत असल्याचे फोटो २५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच भारताकडून पराभूत झाल्याच्या दोन दिवसांनंतर पोस्ट करण्यात आले होत्. यावर निगुगी चासुरा या झिम्बाब्वेच्या चाहत्याने रिप्लाय केला होता. “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. आम्ही उद्या हे प्रकरण तुम्हाला पराभूत करुन मार्गी लावणार आहोत. पाऊस पडणार नाही प्रार्थना करा,” असं या चाहत्याने म्हटलं होतं.

नक्की वाचा >> India Beats Netherlands: विजयानंतर काही मिनिटांमध्ये ‘ती’ पोस्ट करणं दिनेश कार्तिकला महागात पडलं; अनेकांनी झापलं

यावर एका पाकिस्तानी चाहत्याने उत्सुकतेनं नेमका याचा संदर्भ काय असं विचारलं होतं. त्यावर असिफ मोहम्मद हा पाकिस्तानी स्टॅण्डअप कॉमेडियन मिस्टर बीनसारखा दिसतो आणि २०१६ साली तो झिम्बाब्वेला गेला होता. त्याने तिथे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्याने अनेक रोड शो केले होते. हरारेमधील शेती विषयक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्याने हा दौरा केला होता. असिफ यांची ओळख ‘पाक बीन’ अशी आहे. या झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये केवळ मिस्टर बीनप्रमाणे दिसतो या एका कारणासाठी असिफ यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zimbabwe beat pakistan in world cup t20 president emmerson dambudzo mnangagwa trolls pak with epic demand on mr bean controversy scsg